महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालुका कृषि अधिकारी मावळ आणि मंडळ कृषि अधिकारी काले कॉलनी यांच्या मार्गदर्शनाखाली पवन मावळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजने अंतर्गत भातपिक यांत्रिकीकरण प्रकल्प 10 हे क्षेत्रावर राबवला जात आहे. सध्या प्रकल्प अंतर्गत घेण्यात आलेले प्रात्यक्षिक प्लॉट जोमदार आलेले असून भात पीक जोमात आहे.
काही ठिकाणी थोडया फार प्रमाणात करपा, कडा करपा, पाने गुंडळणारी, तपकीरी तुडतुडे, केसाळ अळी दिसू लागल्याने मावळ कृषी विभागाच्या वतीने पवनमावळ परिसरात दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी भात संशोधन केंद्र वडगाव येथील शास्त्रज्ञ डॉ. संदीप कदम हे पवन मावळ भागात भात पिकावरील कीड व रोगाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी करुंज, काले, जवण, शिळिंब, उर्से, बेबडडोहळ, चांदखेड गावात प्रत्यक्ष यांत्रिकीकरण भातपिक प्रात्यक्षिक प्लॉट आणि भात चारसूत्री प्लॉट वर जाऊन पाहणी करून शेतकरी बांधवांना कीड आणि रोग उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. ( Scientists visit under National Food Security Mission Rice Paddy Crop Project in Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मौजे करूंज येथे काले येथे बबन कालेकर, शिळींब येथे मावळ कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदू धनवे, जवण येथे बंडू शिंदे, चांदखेड येथे नितीन गायकवाड यांच्या भात पीक प्लॉटची पाहणी केली असता आढळून आलेल्या कीड आणि रोगाविषयी त्यांनी सविस्तर उपाययोजना सांगून शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे निरासन केले. दौऱ्याच्या वेळी त्याच्या सोबत मंडळ कृषि अधिकारी काळेकॉलनी दत्तात्रय शेटे, कृषि पर्यवेक्षक नंदकुमार साबळे, नागनाथ शिंदे, कृषि सहाय्यक विकास गोसावी, दत्तात्रय गावडे, सुनील गायकवाड, शैला झगडे, मनिषा घोडके, शितल गिरी, प्रमिला भोसले, अश्विनी खंडागळे कृषी सहायक तसेच शेतकरी व कृषिमित्र उपस्थित होते.
‘सध्या स्थितीला पवनमावळ भात पिक चांगल्या स्थितीमध्ये आहे काही ठिकाणी थोड्या प्रमाणात करपा, कडा करपा, तापकिरी तुडतुडे, केसाळ आळी, पाने गुंडळणारी आळी दिसून आली आहे. शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या मार्गदर्शन घेऊन औषध फवारणी करावी. पिकावर फवारणी करताना दुपारी चार वाजल्यानंतर पाऊस नसताना करावी. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत फवारणी करू नये’, असे डॉ. संदीप कदम (शास्त्रज्ञ, भात संशोधन केंद्र वडगाव मावळ) यांनी म्हटले.
अधिक वाचा –
Video : निसर्ग सौंदर्याचा अद्भूत नजारा, घोराडेश्वर डोंगरावर पसरलीये फुलांची भगवी चादर
पिकअपच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, कान्हेफाटा येथील चालकावर गुन्हा दाखल