नवनवीन आव्हानांना शिक्षकांनी कसे तोंड द्यावे, ह्या विषयाला अनुसरून हरकचंद रायचंद बाफना डीएड कॉलेज मध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे च्या अध्यक्षा संध्या थोरात यांनी परिसंवाद आणि प्रशिक्षण कार्यक्रम घडवून आणला. महाविद्यालयाचे प्राचार्य हिरामण लंघे यांनी सदरील परिसंवाद कार्यक्रमाला मान्यता दिली. त्यानंतर मंगळवारी, दिनांक 22 ऑगस्ट हा कार्यक्रम पार पडला. ( teacher training program was conducted at harakchand raichand bafna DEd College by Inner wheel club )
डॉ. विनया केसकर यांनी डीएड कॉलेजमधील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना अगदी मूलभूत प्रश्नांना हात घालून त्यांना बोलते केले. अगदी केजी to पीजी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या भेडसावतात, त्यांच्यासमोर काय आव्हाने आहेत? या विद्यार्थ्यांना आपण कशी मदत करू शकतो? यावर उहापोह केला. मुलांमध्ये होणारे हार्मोनल बदल, त्यांच्या मेंदूची वाढ, वैचारिक क्षमता, भावनात्मक अनुभव आदी गोष्टी समजून घेऊन विद्यार्थी सक्षम कसा होईल, यावर भर दिला पाहिजे असे समजावून सांगितले.
शाळेच्या वर्गातील वातावरण कसे तणावमुक्त राहील, विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद कसा साधायचा, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे, मुले मोहाला बळी पडू नयेत म्हणून यासाठी कशी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे पटवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता त्यांचा आत्मसन्मान जपावा असा मोलाचा सल्लाही दिला. क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात ह्या देखील याच कॉलेजच्या माजी विद्यार्थीनी असून इथे डिग्री घेऊन त्यांनी मार्गक्रमण केल्याचे उपस्थितांना सांगितले.
विद्यार्थिनींच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडावी ह्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन इनरव्हील क्लब तर्फे करण्यात आले होते. प्राध्यापिका शुभांगी हेंद्रे यांनी अत्यंत मार्गदर्शक परिसंवादाबद्दल डॉ विनया केसकर आणि क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात आणि इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांचे आभार मानले. यावेळी बाफना कॉलेजच्या शीतल गवई, शुभांगी हेंद्रे या शिक्षिका उपस्थित होत्या. त्यांनी संध्या थोरात, निशा पवार, प्रकल्प प्रमुख डॉ विनया केसकर तसेच माजी प्रवीण साठे, सभासद कोमल सूर्यवंशी यांचा सत्कार केला. ( teacher training program was conducted at harakchand raichand bafna DEd College by Inner wheel club )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक; ‘आता ही शेवटची मिटींग, महिन्यात निर्णय झाला नाही तर…’
– श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप – दैनिक मावळ श्रावण विशेष लेख
– चंद्रयानच्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगसाठी श्रीमंत दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक । India Chandrayaan 3