सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ, लायन्स क्लब ऑफ कामशेत मावळ, जैन इंग्लिश स्कूल कामशेत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपला बाप्पा आपणच बनवूया पर्यावरण वाचवूया’ अर्थात शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवणे प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडलेय ह्या उपक्रमाचे यंदाचे हे सातवे वर्ष होते. मागील सहा वर्षांपासून कामशेत परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जात आहे. ( training camp for students to make ganesha idols from shadu clay in kamshet maval )
आपण पर्यावरणाचे मित्र आहोत, त्यामुळे पर्यावरणाची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे, असा संदेश ह्या शिबिरातून दिला गेला. साधारण एकूण तीन टप्यामध्ये हे शिबीर होत असते. पाहिल्या टप्यात गणेश मूर्ती तयार करणे, त्यांनतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बनविलेल्या मूर्तींना रंगकाम करणे आणि त्यानंतर शेवटच्या म्हणजे तिसऱ्या टप्यामध्ये गणेश मूर्ती वाटप केल्या जातात. तसेच विद्यार्थी स्वतः बनवलेल्या मूर्तींची घरी प्राणप्रतिष्ठापणा करतात, असा हा उपक्रम आहे.
यंदा सातव्या वर्षात पदार्पण करत असताना या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवरांत IPS सत्यसाई कार्तिक, लायन्स क्लब ऑफ कामशेत मावळचे रिजन पर्सन आरसी आनंद खंडेलवाल, लायन्स क्लब कामशेत मावळचे अध्यक्ष योगेश गायकवाड, हभप दत्तात्रय हजारे महाराज, अनुप सहस्त्रबुद्धे, विवेक सहस्त्रबुद्धे, स्वप्नील शहा, राजू चोपडे, कुंभार समाजोन्नती मंडळ जिल्हा अध्यक्ष संतोष कुंभार, प्रशिक्षक अतिश थोरात, सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळचे अध्यक्ष सहदेव केदारी आदी मान्यवर उपस्थित होते.
“कार्यक्रमाला येऊन अतिशय आनंद झाला. लहान वयात मुलांवर केलेले चांगले संस्कार म्हणजे उद्याची भावी पिढी नक्कीच चांगली होणार आहे. प्रत्येक नागरिकांनी पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे” – सत्यसाई कार्तिक, सहाय्यक पोलिस अधिक्षक लोणावळा विभाग, लोणावळा
शिबिरामध्ये कामशेत परिसरातील जैन इंग्लिश स्कूल, पंडित नेहरू विद्यालय, महर्षी कर्वे आश्रमशाळा, सुमन रमेश तुलसाणी आदी शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. ( training camp for students to make ganesha idols from shadu clay in kamshet maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– तळेगावात अजित फाऊंडेशनमध्ये अॅडविक हाय-टेक कंपनीच्या सीएसआर निधीतून संगणक लॅब
– दैनिक मावळ बुलेटीन : वाचा मावळ तालुक्यातील महत्वाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
– एकवीरादेवी देवस्थानच्या संचालकपदी राजकीय नेता नको – उच्च न्यायालय ; वाचा कोर्टाचे निर्देश