व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात प्रथमच रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार! संपूर्ण वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी फायनल

महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील कुस्ती शौकिनांसाठी महत्वाची असलेली मानाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 3, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Maharashtra-Kesari

Photo Courtesy : Team Dainik Maval


महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील कुस्ती शौकिनांसाठी महत्वाची असलेली मानाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार धाराशिव जिल्ह्यात (पूर्वीचे नाव उस्मानाबाद) रंगणार आहे. एकूण पाच दिवस ही स्पर्धा चालणार आहे. ( Maharashtra Kesari Wrestling Tournament 2023 To Be Held In Dharashiv District View Full Schedule )

महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली मानाची सर्वात मोठी कुस्ती स्पर्धा आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यंदा ह्या स्पर्धेच्या आयोजनाचा मान मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्याला मिळाला आहे. दिनांक 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर या दरम्यान धाराशिवच्या तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या मैदानावर 65 व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा चा थरार रंगणार आहे.

दिनांक 1 ते 5 नोव्हेंबर अशी एकूण 5 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. स्पर्धेत 45 वेगवेगळे जिल्हा संघ सहभागी होणार आहेत. माती आणि गादी असे एकूण 20 वेगवेगळ्या वजनी गटात ही स्पर्धा होईल. जवळपास 900 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून विजेत्यांना स्कॉर्पियो, ट्रॅक्टर आणि बुलेटसह 2 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

धाराशिवला इतिहासात प्रथमच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मान मिळाला आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेचा थरार हा स्टेडियमच्या आत आणि बाहेर देखील चौकाचौकात स्क्रीनद्वारे पाहायला मिळणार आहे. धाराशिवमध्ये होणाऱ्या स्पर्धेचे आयोजक धाराशिव जिल्हा तालीम संघ, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ हे असणार आहेत. ( Maharashtra Kesari Wrestling Tournament 2023 To Be Held In Dharashiv District View Full Schedule )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘इलेक्ट्रिकल टेक्निशियन यांना चांगली पगारवाढ देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, लवकरच निर्णय’
– रांजणगाव इथे उभे राहणार ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’, केंद्राकडून 62.39 कोटींचा निधी राज्य सरकारकडे वर्ग
– ‘पवना धरणातील पाणी पाहिजे पण पवना नदी नको, असं का?’, पवनमावळची जीवनदायिनी पुढे बनतेय मैलावाहिनी


Previous Post

गोरक्षणात प्राण गमावलेल्या गोरक्षकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 लाख; औंध इथे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

दैनिक मावळ बुलेटीन : वाचा मावळ तालुक्यातील महत्वाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
dainik-maval-news-bulletin

दैनिक मावळ बुलेटीन : वाचा मावळ तालुक्यातील महत्वाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Concrete decisions to accelerate Lonavala Sky Walk project joint meeting of MLA Sunil Shelke District Collector PMRDA Commissioner

आमदार शेळके, जिल्हाधिकारी आणि PMRDA आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती देण्यासाठी ठोस निर्णय

May 24, 2026
Draft electoral roll voting list

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

May 24, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

May 24, 2026
Indrayani rice seed distribution center opens at Vadgaon Maval Farmers will get high quality seeds

वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे

May 24, 2026
Illegal sex determination racket reaches Maval Srirampur police seize illegal sonography machine in Vadgaon

बेकायदा गर्भलिंग तपासणीचे रॅकेट मावळपर्यंत… श्रीरामपूर पोलिसांकडून वडगावात अवैध सोनोग्राफी मशीन जप्त

May 24, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

May 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.