- सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात 837 कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय बुधवारी (दिनांक 6 सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पामुळे नागरिकांना एका फोनद्वारे, आठवडाभर / 24 तास कार्यरत कॉल सेंटरवर तक्रार नोंदवता येणार आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवच्या आयोजनासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव फाऊंडेशन गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव दरवर्षी जानेवारी महिन्याचा तिसरा शनिवार ते चौथा रविवार असे एकूण 9 दिवस आयोजित करण्यात येईल.
केंद्राच्या विविध कंपन्यांना मालमत्ता आणि जमिनीच्या हस्तांतरण दस्तांवर मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मध्य नागपूरमधील नाईकवाडी बांगलादेश झोपडपट्टीतील घरांसाठी लोकहितास्तव मुद्रांक शुल्क कमी करुन 1000 इतके निश्चित करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
- मेट्रो कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचा त्याचप्रमाणे राज्यातील मेट्रो प्रकल्पांना ब्रीज लोनसाठी शासन हमी देण्यासंदर्भात निर्णय घेण्याकरिता उच्चाधिकार समिती नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. हे कर्ज अटी आणि शर्तींच्या अधीन राहून उपलब्ध करून देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्देश –
राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 81.07 टक्के पाऊस झाला असून कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते नियोजन काटेकोरपणे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
महाराष्ट्रात 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. नियमानुसार पीक विम्याचा अग्रीम, पिण्याचे पाणी, चारा उपलब्धता यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
‘माझी माती माझा देश’ अंतर्गत 1 सप्टेंबरपासून अमृत कलश यात्रा सुरु झाली असून राज्यातदेखील 4 टप्प्यांमध्ये ही यात्रा पार पडेल. सर्व मंत्र्यांनी आपापल्या भागात ही यात्रा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ब्रेकिंग! ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– वडगाव नगरपंचायतीला मिळाले नवे ‘कारभारी’, 5 वर्षांत 4 कारभारी
– खेळाला साहित्याची जोडी, लहानग्यांना लागणार वाचनाची गोडी! शिळींब गावात ‘पालवी’ वाचनालयाची सुरुवात