‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ ह्या उक्तीप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानंतर त्याच्या कीर्तीचे गोडवे गायले जातात आणि उपस्थितांचे डोळे पाणवतात, असे क्षण पाहायला क्वचितच मिळतात. परंतू मावळ तालुक्यात शनिवारी (दिनांक 9 सप्टेंबर) रोजी हे चित्र पाहायला मिळाले. मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक गावातील माजी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी पोलिस पाटील कै विठ्ठल दगडू असवले पाटील यांचे गुरुवार (दिनांक 31 ऑगस्ट) रोजी निधन झाले. समाजकार्यात नेहमी अग्रस्थानी राहणारे असवले पाटील यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करणात आला. त्यानंतर शनिवारी (9 सप्टेंबर) कै विठ्ठल असवले यांच्या दशक्रिया विधीला अपेक्षेप्रमाणे मोठा जनसमुदाय गोळा झाल्याचे पाहायला मिळाला. ( Takwe Budruk Maval Shok Sabha thousands of people attended vitthal asawale condolence meeting )
दशक्रिया विधीला उपस्थित हजारोंच्या जनसमुदायात अनेक मान्यवर नेते, विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, कात्रज डेअरीचे माजी चेअरमन बाळासाहेब नेवाळे, बाळासाहेब काशिद, महाराष्ट्र प्रदेश पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, शिवसेना तालुका प्रमुख राजु खांडभोर, मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळस्कर, राष्ट्रवादी कार्यध्यक्ष दीपक हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी कै विठ्ठल असवले पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मनोगत व्यक्त करताना अनेकांनी असवले पाटील यांच्या आठवणी जागवल्या. असवले यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची मान्यवरांनी आठवण काढताना उपस्थितांनीही टाळ्यांचा गजर करुन त्याला प्रतिसाद दिला. मदन बाफना यांनी कै विठ्ठल असवले यांचे जीवनकार्य श्रद्धांजली सभेत उलगडून दाखवले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजून त्याचे समर्थन केले. सामाजिक, राजकीय, कला, क्रिडा, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली सभेचे सूत्रसंचालन राजु शिंदे आणि मारुती असवले यांनी केले.
टाकवे बुद्रुक गावचे माजी पोलिस पाटील कै. विठ्ठल असवले यांचे दिनांक 31 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा आणि सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या स्नुषा सुवर्णा असवले ह्या टाकवे बुद्रुक गावच्या विद्यमान सरपंच आहेत. कै विठ्ठल असवले (पाटील) यांच्या दशक्रिया विधी दिनी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (आळंदीकर) यांची प्रवचन सेवा झाली. ( Takwe Budruk Maval Shok Sabha thousands of people attended vitthal asawale condolence meeting )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘त्याचा हसतमुख चेहरा असाच कायम स्मरणात राहील’, मावळच्या शहीद सुपुत्राच्या कुटुंबीयांचा प्रेरणादायी निर्णय
– पोलिसांची दबंग कामगिरी! लोणावळ्यात घरफोडी करणारी टोळी जेरबंद, एकाचवेळी दहा गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल जप्त
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची बदली करा’, आमदार सुनिल शेळकेंचे नगरविकास विभागाला पत्र, वाचा