अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड आणि मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आयोजित ‘शिक्षक कृतज्ञता सोहळा’ आज (रविवार, दिनांक 10 सप्टेंबर) चिंचवड इथे संपन्न झाला. यावेळी आमदार सुनिल शेळके यांच्यासह अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल नाना काटे, ॲड. सचिन भोसले, अनंत कोऱ्हाळे, माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ धोत्रे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, वि. म. शिंदे, उपशिक्षणाधिकारी मुकुंद देंडगे, विस्तार अधिकारी शोभाताई वहिले, अभिनेते संतोष पवार, शिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते. ( Teacher Gratitude Ceremony organized by Maval Teacher Prabodhan Parivar )
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, मावळ शिक्षण प्रबोधन परिवार आणि अ.भा.नाट्य परिषद मध्यवर्ती संघटना मुंबई चे उपाध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या वतीने “शिक्षक कृतज्ञता सोहळा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी महाराष्ट्रातील एकमेव “राष्ट्रीय आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार” विजेते शिक्षक “मृणाल गांजाळे” यांच्यासहित इतर शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षक, शिक्षकांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची बदली करा’, आमदार सुनिल शेळकेंचे नगरविकास विभागाला पत्र, वाचा– ‘त्याचा हसतमुख चेहरा असाच कायम स्मरणात राहील’, मावळच्या शहीद सुपुत्राच्या कुटुंबीयांचा प्रेरणादायी निर्णय
– मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खास पर्वणी, तळेगाव दाभाडे इथे मधमाशी पालन प्रशिक्षण वर्ग, जाणून घ्या सविस्तर