सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र अल्ताफ दादासाहेब शेख यांनी चित्रपटसृष्टीची कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्दीच्या बळावर अत्यंत कमी वयात पुणे शहर गाठले आणि करिअर करायचे ते चित्रपट सृष्टीतच, ही खून गाठ मनात पक्की बांधून सुरू केलेला प्रवास आज त्यांना विदेशातून पुरस्कार देऊन गेला. आत्तापर्यंत च्या कारकिर्दीत वेडा BF, बेतुका, कम ऑन विष्णू, डबल्यु, असे एकाहून एक सरस चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांच्या नावाची नुकतीच लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.
त्यांचा 2018 साली प्रदर्शित चित्रपट वेडा बी एफ मधील अल्ताफ राजा यांनी प्रथमच मराठीत गायलेली कव्वाली. हे माझे दुर्वेश बाबा या गाण्यासाठी त्यांच्या नावाची नव्या किर्तीमानात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. हा चित्रपट तयार होत असतानाचा एक प्रसंग अल्ताफ शेख सांगतात, जेव्हा अल्ताफ राजा यांना मराठीत कव्वाली गाण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी नकार दिला होता. कारण मराठीत कव्वाली गायन कसे करणार? हा त्यांच्यासमोर यक्ष प्रश्न होता. परंतु याही समस्येवर अल्ताफ शेख यांनी तोडगा सुचवला आणि ते गाण्यास तयार झाले. ( Marathi Movie Writer Director Altaf Dadasaheb Shaikh Name Registered in London Book of World Records )
‘हे माझे दूर्वेश बाबा’ ह्याच त्या कव्वालीमुळे चित्रपटाने हाई रेंज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, ब्रावो इंटरनॅशनल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड स्थापित केला तसेच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार ही प्राप्त झाला. अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले. हिंदू-मुस्लिम ऐक्यावर आधारित ह्या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता नागेश भोसले यांची प्रमुख भूमिका होती. अल्ताफ शेख यांच्या लेखणीची जादू भारतातच नव्हे तर विदेशात ही दिसते. 4 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नंतर आता 5 बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावे झालाय. याबद्दल सिने सृष्टीतील तारे व राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
येत्या काळात त्यांचे बेतूका, लोरी हे हिंदीत, धारावी कट्टा हा बहुभाषिक चित्रपट तर कर्मयोगी आबासाहेब हा चरित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. चित्रपटसृष्टीत फक्त दिग्दर्शक म्हणूनच नाही तर, लेखक, पटकथा लेखक, संवाद लेखक, गीतकार अशा जवळपास प्रत्येक पातळीवर ते आपल्यातील नैसर्गिक उपजत गुण यशस्वीरित्या दाखवीत आहेत. एवढेच नव्हे तर विदेशाहून आलेले दोन्ही पुरस्कार त्यांनी कुठलाही मोठा लवाजमा गोळा न करता जो पोस्टमन हे दोन्ही पुरस्कार घेऊन आला होता त्यालाच मोठेपण देऊन त्याच्या हस्ते स्वीकारले. यातून अल्ताफ शेख यांच्या मनाचे सर्वसामान्य विषयी असलेले मोठेपण अधोरेखित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– सर्वात मोठी बातमी! कोपर्डी बला’त्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीची येरवडा कारागृहात आत्म’हत्या
– मरावे परी कीर्ती रूपे उरावे! दशक्रिया विधीलाही टाळ्यांचा कडकडाट – Maval News
– मोठी बातमी! शिंदे सरकारने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाची स्थगिती उठवली; मावळातील नेत्यांचे अपयशी प्रयत्न