वडगाव मावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात तब्बल 4 हजार 611 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून विविध संस्थांची 8 कोटी 27 लाख 55 हजार रुपयांची वसुली झाली. राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरण व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. पल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे लोक न्यायालय झाले.
या लोक न्यायालयात प्रलंबित असलेली विविध संस्थांची, मोटार वाहन कायद्यांतर्गत येणारी नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, विविध बँकांची प्रकरणे, धनादेश न वटल्याची प्रकरणे, नगरपालिका, ग्रामपंचायत घरपट्टी व पाणीपट्टी तसेच दिवाणी प्रकरणे ठेवण्यात आली होती. दिवसभरात 4 हजार 611 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोडी अंती तब्बल 8 कोटी 27 लाख 55 हजार 914 रुपयांची वसुली झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यात पॅनेल प्रमुख म्हणून सत्र न्यायाधीश एस. एस. पल्लोड, दिवाणी न्यायाधीश आर. ए. शिंदे, दिवाणी व फौजदारी न्यायाधीश आर. एन. चव्हाण, एस. जे. कातकर, के. ए. देशपांडे यांनी काम पाहिले. पॅनेल न्यायाधीश म्हणून ॲड. अविनाश पवार, ॲड. रामदास नाणेकर, ॲड. दीपेश पोरवाल, ॲड. रूपाली सातकर, ॲड. रुबिया तांबोळी यांनी काम पाहिले. वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संजय वांद्रे यांच्यासह सर्व पदाधिकारी, वकील वर्ग, पक्षकार व न्यायिक कर्मचारी यांनी सहकार्य केले. ( 4 thousand 611 cases were settled in Lok Adalat at Vadgaon Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– खुशखबर! गणेशोत्सवात सहा दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी, वाचा नवीन आदेश
– मावळ तालुक्यात पारंपारिक पद्धतीने गौरी मातेचे आगमन
– माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्याकडून गणेश भक्तांना 35000 हजार मोदकांचा महाप्रसाद वाटप