खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द, मरकळ, गोलेगाव, वडगाव घेनंद इत्यादी गावांसाठी मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणातून थेट पाणी उचलण्यास स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. ह्या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक आमदार सुनिल शेळके यांनी मंगळवार (दिनांक 26 सप्टेंबर) आढावा बैठक घेतली.
जाधववाडी धरणाच्या पाण्यावर नवलाख उंब्रे, बधलवाडी, जाधववाडी, मिंडेवाडी, इंदोरी तसेच सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे इत्यादी गावे अवलंबून आहेत. या भागातील औद्योगिक क्षेत्र व वाढते नागरिकीकरण याचा विचार करता भविष्यात या परिसरात अधिक पाण्याची गरज भासणार आहे. सध्याचा होणारा पाणीसाठा ऐन उन्हाळ्यात अपुरा पडत आहे. त्यातच धरणातील पाणी थेट तालुक्याबाहेर नेले जात असेल तर अतिरिक्त पाणी कोठून आणायचे, असा सवाल येथील स्थानिकांनी उपस्थित करत पाणी उचलण्यास विरोध केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
चऱ्होली आणि इतर गावांलगत इंद्रायणी नदीचा प्रवाह असुन देखील जाधववाडी धरण ते चऱ्होली अशी सुमारे 33 किलोमीटर अंतर पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. पर्यायी स्त्रोत म्हणून धरणाऐवजी इंद्रायणी नदीतुन पाणी घेण्याचे नियोजन करावे, असे आमदार शेळकेंनी अधिकाऱ्यांना सुचवले. तसेच अधिकाऱ्यांनी मावळातील गावांना आवश्यक असणाऱ्या पाण्याचा सविस्तर तपशील घेतल्याशिवाय परस्पर निर्णय घेऊ नयेत, अशी तंबी देखील दिली. ( Jadhavwadi Dam Maval Villages in Taluka should be considered before lifting water MLA Sunil Shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘पोरी जरा जपून’ व्याख्यानाला उदंड प्रतिसाद; विद्यार्थीनी आणि महिला-भगिनींची लक्षणीय उपस्थिती । Pavananagar
– मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याचे आमदार सुनिल शेळके यांचे आदेश
– नागाथली येथील ‘त्या’ बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ! झऱ्याखाली जखमी होऊन मृत्यू झाल्याचा अंदाज