गणेशोत्सव हा प्रत्येकालाच हवाहवासा वाटणारा सण. गणेश बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचा हा उत्सव असा काय साजरा केला जातो की लहानपणापासूनच गणेशोत्सवाची आवड अपोआप निर्माण होते. अशात तारूण्यात शिक्षण अथवा कामानिमित्त गाव, राज्य किंवा देश सोडावा लागल्यानंतर गणेश उत्सवाची ओढ लागू लागते. ( Prathamesh Hinge from Talegaon Dabhade celebrated Ganesh Utsav 2023 in Slovakia Country Europe )
तळेगाव दाभाडेचा सुपुत्र प्रथमेश हिंगे याने मात्र परदेशात स्थायिक झाल्यावर तिथेही गणेश बाप्पाचा उत्सव अगदी थाटामाटात साजरा करत आपली गणेशभक्ती खंडित होऊ दिलेली नाही. इतकेच नाही तर कंपनीतील सहकारी, सवंगडी यांना सोबत घेऊन पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करत भारतीय संस्कृतीची जपवणूक केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगावमधील विलास हिंगे यांचा मुलगा प्रथमेश हा नोकरीनिमित्त युरोपमधील स्लोव्हाकीया या देशात स्थायिक आहे. तिथे त्याने मित्रांसोबत गणेशोत्सव साजरा केला आहे. प्रथमेश हा एका नामांकित कंपनीत नोकरीला आहे, त्यामुळे तो स्लोव्हाकीया देशातच राहतो. लहानपणापासून गणेश उत्सवामध्ये सहभागी होणारा प्रथमेश तळेगाव शहरातील मानाचा पहिला गणपती असणाऱ्या डोळसनाथ तालीम मंडळाचा सक्रीय सभासद होता. त्यामुळे येथील भारतीय संस्कृती परदेशातही जपत प्रथमेशने युरोपमध्ये भारतीय युवकांना बरोबर घेून 5 दिवसांचा गणेश उत्सव साजरा केला.
ह्यात दोन्ही वेळची आरती, प्रसाद आणि विसर्जनावेळी महाप्रसादाचे आयोजन केले होते. ह्या उत्सवात तेथील भारतीय युवक, कंपनीतील सहकारी मोठ्या भक्तीभावनेने सहभागी झाले होते. यापुढेही आपली भारतीय संस्कृती परदेशात रुजवण्याचा आणि जपण्याचा मानस प्रथमेशने बोलून दाखवला. प्रथमेशचे वडील विलास हिंगे (तळेगाव दाभाडे) यांनी दैनिक मावळला ही माहिती दिली. ( Prathamesh Hinge from Talegaon Dabhade celebrated Ganesh Utsav 2023 in Slovakia Country Europe )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या प्रक्रिया
– तळेगाव दाभाडे इथे राजे उमाजी नाईक यांची 232वी जयंती उत्साहात साजरी; आप्पासाहेब चव्हाण यांची उपस्थिती
– सुट्ट्याच सुट्ट्या…! गुरुवार ते सोमवार अशा आहेत सुट्ट्या, सरकारी कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्यांची पर्वणी