गणेशोत्सव हा सण अत्यंत श्रद्धेने आणि मोठ्या भक्तिभावाने महाराष्ट्राभर अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बरोबरीने वडगाव शहरांमध्ये घरोघरी घरगुती गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापूर्वी घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो. मग ते दिव्यांची आरस असो वा फुलांची तोरण, थर्माकोलचे आकर्षण मखर असो वा गणेशाची सुंदर मूर्ती असो ! हि सजावट अगदी मनोभावे आणि जोरदार केली जाते. घरगुती गणपतींना होणारी हि सजावट लक्षात घेता मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2023 हा उपक्रम राबवण्यात आला होता.
वडगाव मधील सर्वच रहिवाशांनी श्री गणेशाची सजावट अतिशय देखणी केली होती. या स्पर्धेत शहरातील जवळपास दोनशे ते सव्वादोनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सामाजिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, नैसर्गिक, इकोफ्रेंडली, काल्पनिक असे एकूण सहा विषय होते. व्याख्याते विवेक गुरुव आणि अनिल कोद्रे यांनी सहभागी झालेल्या स्पर्धेकांच्या निवासस्थानी भेट देऊन परिक्षण केले. पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धेत स्पर्धेकांचा सहभाग अतिशय मोठ्या प्रमाणावर असल्याने तसेच सर्वच स्पर्धेकांचे सजावट काम अतिशय सुंदर असल्याने प्रत्येक कॅटेगरी मध्ये विजेते विभागून घोषित करण्यात आले.
गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान मोरया प्रतिष्ठान, वडगाव पत्रकार संघ आणि युवक राष्ट्रवादी, ओबीसी, सामाजिक न्याय, जेष्ठ नागरिक सह इतर सर्व सेल यांच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी स्वागत केले. तसेच वडगाव पत्रकार संघ, वडगाव राष्ट्रवादी व काँग्रेस सर्व सेल च्या पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ( Eco Friendly Home Ganesha Decoration Competition in Vadgaon Maval City by Morya Pratishthan )
गणेश विसर्जन मिरवणूक प्रसंगी पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल घोषित करून उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू भेट देण्यात आल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
विजेते स्पर्धेक खालीलप्रमाणे;
विषय – सामाजिक
प्रथम क्रमांक : १) मयुरेश सुळोकर २) विलास मालपोटे
द्वितीय क्रमांक : १) सुरेखा बाळू कुंभार २) संतोष ढोरे
तृतीय क्रमांक : १) निकीता वानखेडे २) संस्कृती अहिरे
विषय – वैज्ञानिक
प्रथम क्रमांक : १) ओवी मंगेश जाधव २) अमित यशवंत कुंभार
द्वितीय क्रमांक : १) ज्योती बाबाजी हारकुडे २) मयुरी निलेश चोपडे
तृतीय क्रमांक : १) चेतन घाग २) रोहित जाधव
विषय – नैसर्गिक
प्रथम क्रमांक : १) योगिता बापू भोर
द्वितीय क्रमांक : १) गणेश भिलारे २) शामल शेटे
तृतीय क्रमांक : १) संदेश ढोरे २) सचिन पंडीत
विषय ऐतिहासिक
प्रथम क्रमांक : १) ऐश्वर्या बाळकृष्ण ढोरे २) चैत्राली गणेश दंडेल
द्वितीय क्रमांक : १) विक्रम विठ्ठल जाधव २) विश्वजीत विवेक गुरुव
तृतीय क्रमांक : १) किरण अविनाश लखिमरे २) समर्थ अँकॅडमी दुधाने सर
विषय – काल्पनिक
प्रथम क्रमांक : १) शिवाजी संपतराव लवंगारे
द्वितीय क्रमांक : १) सूर्यकांत दिनेश काकरे
तृतीय क्रमांक : १) कल्याणी गाडे
विषय – इकोफ्रेंडली
प्रथम क्रमांक : १) सागर अंकुश म्हाळसकर २) हिरामण जम
द्वितीय क्रमांक : १) मुकुंद शिवाजी पवार २) कोमल निखिलेश पुन्मिया
तृतीय क्रमांक : १) देविदास थरकुडे २) संतोष पवार
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन; विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाहतूक सेल अध्यक्षपदी विनोद वरखडे; अजितदादांच्या हस्ते नियुक्तीपत्र । Pimpri Chinchwad
– तळेगाव दाभाडे इथे राजे उमाजी नाईक यांची 232वी जयंती उत्साहात साजरी; आप्पासाहेब चव्हाण यांची उपस्थिती