राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) वाहतूक सेल अध्यक्षपदी विनोद शंकरराव वरखडे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वरखडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्षाचा आणि संघटनेचा अधिक विस्तार करणे आणि पक्षाचे विचार समाजातील तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याकडून त्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असताना पिंपरी चिंचवड वाहतुक सेल अध्यक्षपदी विनोद वरखडे यांची निवड करण्यात आली. यावेळी शहर अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष फजल शेख, सामाजिक कार्यकर्ते विकास साने, संतोष मायने, नवनाथ लोखंडे, नगरसेवक राहुल भोसले, नगरसेवक पंकज भालेकर आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
“ह्यापुढे अजितदादा यांचे विचार आणि कार्य तळागळातील जनतेपर्यंत पोहोचणार आणि पक्ष वाढीसाठी आणखीन जोमाने काम करणार.” – विनोद वरखडे
( Vinod Varkhade Apointed As President Of NCP Pimpri Chinchwad City Transport Cell )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– सुट्ट्याच सुट्ट्या…! गुरुवार ते सोमवार अशा आहेत सुट्ट्या, सरकारी कर्मचाऱ्यांना सलग सुट्ट्यांची पर्वणी
– सुदवडी गावात गणेशभक्तांसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून स्पर्धांचे आयोजन
– प्रख्यात साहित्यिक शरद गोरे यांना विधान परिषदेवर संधी द्या! मावळमधील 1 हजार नागरिकांची निवेदनाद्वारे मागणी