राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीतील दादा आणि साहेब गटाने अर्थात अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाने आपापल्या गटाची बांधणी जोरात सुरु केल्याचे दिसत आहे. ह्यात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे, नवनवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे, सभा घेणे या गोष्टींनी जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्यासोबत असलेले आणि अजितदादा यांचे खंदे समर्थक मानले जाणारे आमदार सुनिल शेळके यांच्या मतदारसंघात अर्थात मावळ तालुक्यात शरद पवार यांच्याकडून पहिला डाव टाकण्यात आला आहे.
- वडगाव मावळ येथील अतुल चंद्रकांत राऊत यांची शरद पवार यांच्याकडून थेट पुणे जिल्हा ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या पुणे जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षपदी अतुल राऊत यांची नियुक्ती केल्याचे नियुक्तीपत्र खुद्द शरद पवार यांच्या हस्ते राऊत यांना गुरुवारी (दिनांक 28 सप्टेंबर) प्रदान करण्यात आले. यावेळी मंगेश खैरे, विशाल वहिले आदीजण उपस्थित होते.
अतुल राऊत यांनी यापुर्वीही राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्या माध्यमातून चांगले काम केले आहे. राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच मावळ तालुक्यात राष्ट्रवादीच्या ओबीसी मोर्चाची कमान त्यांनी चांगल्याप्रकारे संभाळली होती. यासह तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शरद पवार, जयंत पवार या वरिष्ट नेत्यांसोबत अतुल राऊत यांची असलेले संबंध आणि जवळीक सर्वश्रूत आहे. अशात आता थेट शरद पवार यांच्याकडूनच राऊत यांच्यावर जिल्हा पातळीवर पद आणि जबाबदारी मिळाल्याने त्यांच्याकडून नव्या दम्याने आणि अधिक कामाची अपेक्षा असणार आहे. तसेच भविष्यात वेळ आल्यास शरद पवार गटाचे पक्ष संघटन मावळ तालुक्यात मजबूत करण्यासाठीही त्यांना धावावे लागणार आहे. ( Vadgaon Maval Atul Raut Appointed As Pune District President of OBC Division of NCP Party )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महाराष्ट्रात गणपती विसर्जनाला गालबोट! ठिकठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनेक गणेशभक्तांचा मृत्यू, जखमींची संख्याही अधिक
– भारतातील हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे निधन; विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाहतूक सेल अध्यक्षपदी विनोद वरखडे; अजितदादांच्या हस्ते नियुक्तीपत्र । Pimpri Chinchwad