बाळासाहेब मारुती चव्हाण यांची काँग्रेस (आय) पक्षाच्या वडगांव शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मावळ तालुका काँग्रेस (आय) कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी बाळासाहेब चव्हाण यांची नियुक्ती जाहीर केली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या हस्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चव्हाण यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
काँग्रेसचे नेते रामदास काकडे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर, तालुका युवकअध्यक्ष राजेश वाघोले, मिलिंद अच्युत, रोहिदास वाळुंज, नाना खांदवे, अनिश तांबोळी, योगेश पारगे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
“वडगाव शहर काँग्रेस (आय) पक्षाचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब चव्हाण यांच्याकडून पक्षाचे संघटन वाढवणे, शहरात पक्ष आणखीन बळकट करणे, पक्षाचा विचार तळागाळात पोहोचवणे आदी योगदान पक्षाला अपेक्षित आहे”, अशी माहिती तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी दैनिक मावळला दिली. ( Balasaheb Chavan has been appointed as President of Vadgaon Maval City of Congress Party )
बाळासाहेब चव्हाण – काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते
बाळासाहेब चव्हाण हे काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. टाटा मोटर्स कंपनीत युनियन लीडर म्हणून त्यांनी नेतृत्वाला सुरुवात केली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रीय झाले. 2018 पासून 2022 पर्यंत वडगाव मावळ शहर काँग्रेस (आय) पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच सामाजिक कार्यात जय हिंद मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष, सह्याद्री जीम वडगावचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही ते परिचित आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कान्हे सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणूकीत अनिल मोहिते बहुमताने विजयी
– जनरल मोटर्स कंपनीतील अन्यायग्रस्त 1 हजार कामगारांच्या बेमुदत साखळी उपोषणाला वडगाव शहर भाजपाचा पाठींबा
– जनरल मोटर्स कंपनीतील 1 हजार कामगारांच्या बेमुदत साखळी उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शहरचा पाठींबा