जर तुम्ही मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन उद्या अर्थात मंगळवारी (दिनांक 10 ऑक्टोबर) प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. याचे कारण मंगळवारी दुपारी 12.00 ते 2.00 वाजताच्या दरम्यान एक्सप्रेस वेवरील पुणे लेनवर बोरघाट हद्दीत ग्रँटी बसवण्यात येणार आहे. बोरघाट हद्दीत किलोमीटर 45 व किलोमीटर 45/800 या ठिकाणी ITMS प्रोजेक्ट अंतर्गत Gantry बसवण्यात येणार आहे.
Gantry बसविताना सदर कालावधीत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. फक्त कारसाठी जुना पुणे मुंबई महामार्ग शिंग्रोबा घाटातील सुरू राहील, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी म.रा.र.वि.म.(मर्या) यांच्याकडून देण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
“यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर कि.मी. 45/000 अमृतांजन पुल आणि पुणे वाहिनीवर कि.मी 45/800 खंडाळा बोगदा इथे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात येणार आहे. या लांबीत पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते दुपारी 2 या वेळेत पुर्णत: बंद राहणार आहे. सदर काम पुर्ण झाल्यावर दुपारी 2 वाजता पुणेकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल.” अशी माहिती देण्यात आली आहे. ( block for installation of grantee near borghat on mumbai pune expressway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मोठी बातमी! लोणावळ्यातील टाटा धरणात बुडून दोन नेपाळी तरुणांचा मृत्यू । Lonavala News
– महाराष्ट्राची कुस्तीपटू क्षितिजा मरागजे हिची मध्यप्रदेशात झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदकाची कामगिरी
– काँग्रेस (आय) पक्षाच्या वडगांव मावळ शहर अध्यक्षपदी बाळासाहेब चव्हाण यांची नियुक्ती । Maval Taluka Politics