वडगाव शहरातील मोरया महिला प्रतिष्ठान शहरातील महिला भगिनींसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात प्रयत्नशील असते. असाच एक अनोखा उपक्रम नवरात्री सणानिमित्त रास दांडिया गरबा या पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ( Ras Dandiya Garba 5 Day Training Camp Start in Vadgaon Maval Navratri 2023 )
‘मोरया महिला प्रतिष्ठान नेहमीच महिलांच्या मनावर संस्कार आणि मनगटात साहस निर्माण करते असते. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा ते कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावं या उद्देशाने अतिशय अल्प दरात रास दांडिया गरबा प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.’ अशी माहिती अबोली ढोरे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दिनांक 9 ते 13 ऑक्टोबर या पाच दिवसीय गरबा प्रशिक्षणास पुण्यातील व्हि जे फिटनेस क्लब चे सुप्रसिद्ध प्रशिक्षक अजिंक्य बन्सी यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तरी वडगाव शहरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी केले आहे. यावेळी मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका आणि प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– शिवलीतील माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा ऋणानुबंध सोहळा संपन्न; शाळेला केली मोठी आर्थिक मदत
– Breaking! मंगळवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी लगेच वाचा, पुणे लेन ‘इथे’ बंद राहणार
– महागाव ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी योगिता सावंत बिनविरोध । Gram Panchayat Election