पुणे विभाग महिला समन्वय समिती यांचे वतीने पुणे विभागातील (पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, मावळ, बारामती) परिसरातील सर्व महिला भगिनींचे भव्य राजमाता जिजाऊ संमेलन रविवार दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत येथील शुभम गार्डन वाल्हेकरवाडी रावेत पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘नारी तू नारायणी’ या भावनेने अनेक जबाबदाऱ्या सांभाळून अनेक आयामांवर महिला काम करत असतात या सर्व महिला एकत्रित याव्यात, विचारांची देवाणघेवाण होऊन प्रगती व्हावी, त्यातून कामाची प्रेरणा मिळावी या हेतूने समाजाच्या विविधस्तरातील महिलांचे एकत्रिकरण, सबलीकरणाकरीता विविध उपक्रम राबविणाऱ्या महिला समन्वय समिती तर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शहरातील अनेक महिला संस्था, संघटना सहभागी होत आहेत. ( Rajmata Jijau Women Rally in Pimpri Chinchwad )
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी तत्व हिलिंगच्या संस्थापिका अर्चना अग्रवाल आहेत तर देशाच्या विकासात महिलांचे स्थान या विषयावर प्रमुख वक्त्या सुवर्णा गोखले, भारतीय स्त्री ही संस्कारी स्त्री , विश्व कल्याण हेच तिचे ध्येय या विषयावर लिखिका, माजी प्राचार्य डॉ. अश्विनी धोंगडे या मार्गदर्शन करणार असून गट चर्चेचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले आहे. या संमेलनास शहरातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजिका निवेदिता कच्छवा व सहसंयोजिका ज्योती पठानिया यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? कोजागिरी शब्दाचा अर्थ काय? कोजागिरी पौर्णिमेला दूध का पितात? जाणून घ्या सर्वकाही
– एकदम अचूक आकडेवारी! निवडणूका जाहीर झालेल्या मावळातील 29 ग्रामपंचायतींचं अंतिम चित्र काय आहे? लगेच वाचा
– आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य भजन स्पर्धा; पहिल्यांदाच पुरुषांसह महिलांचेही संघ सहभागी