हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार शुक्रवारी (दिनांक 10 नोव्हेंबर) राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यालाही अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. तालुक्यातील अनेक भागात गुरुवार आणि शुक्रवार असा सलग दोन दिवस अवकाळी पाऊस कोसळला आहे. त्यातही शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शुक्रवारी पवनमावळ, आंदर मावळ, कामशेत, वडगाव मावळ, लोणावळा भागात सलग दोन ते तीन तास अवकाळी पाऊस बरसला. पावसामुळे या भागातील भात पिके आता संकटात आली आहे. सध्या खरीप हंगामातील भात पिक काढणीला आली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी काढणी करून पिके शेतात ठेवली आहेत. त्यात आता अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांना हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून नेण्याची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. ( Unseasonal Rain in Maval Taluka Pavan Mawal Area November 2023 )
अधिक वाचा –
– कामाची बातमी! पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या प्रक्रिया
– धनगर समाजाच्या उन्नतीसाठी योजना राबवणार, राज्यातील निर्यातीला वेग देणार; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय
– महत्वाची बातमी! मावळ तालुका काँग्रेस (आय) उपाध्यक्षपदी राजू फलके यांची नियुक्ती