व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामाची बातमी! पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; जाणून घ्या प्रक्रिया

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ८ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 10, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Department-of-Animal-Husbandry

Photo Courtesy : Team Dainik Maval


पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी ८ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, १ हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५+३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२३-२४ या वर्षात राबविली जाणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

इच्छुकांनी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर किंवा ‘एएच-एमएएचएबीएमएस’ मोबाईल ॲपद्वारे अर्ज करावा. अर्ज करताना दुग्धव्यवसाय, कुक्कटपालन किंवा शेळीपालन यापैकी स्वतंत्रपणे निवड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. अर्ज भरताना नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावरच अर्जाच्या स्थितीबाबतचे संदेश पाठविले जाणार असल्याने अर्जदाराने कोणत्याही स्थितीत मोबाईल क्रमांक बदलू नये. ( Department of Animal Husbandry Scheme Information and Application Process )

  • अर्जदाराने एखाद्या योजनेकरीता एकदा अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी पुढील पाच वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे यापूर्वी अर्ज केलेल्या प्रतिक्षा यादीतील अर्जदारांनाही नव्याने अर्ज न करता योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.

या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असल्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्ज केल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक बदलणार नाही याची दक्षता घ्यावी.

अधिक माहितीसाठी १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– छगन भुजबळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची वडगाव मावळ पोलिसांकडे तक्रार
– मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भारत काळे बिनविरोध; कार्यकारी संचालकपदी ‘यांची’ निवड
– वसुबारस : दिवाळीचा पहिला सण असलेल्या वसुबारसचे महत्व काय? वसुबारस कशी साजरी करतात? जाणून घ्या


dainik maval jahirat

Previous Post

धनगर समाजाच्या उन्नतीसाठी योजना राबवणार, राज्यातील निर्यातीला वेग देणार; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

Next Post

करुंज गावातील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचा उलगडा, पोलिसांकडून 3 आरोपी गजाआड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
crime-arrested

करुंज गावातील 'त्या' तरुणाच्या हत्येचा उलगडा, पोलिसांकडून 3 आरोपी गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.