मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. दिवाळीपूर्वी नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप केले जात आहे. महिला बचत गटांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पक्षात आलेल्या प्रत्येकाला न्याय दिला जाईल. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना व युवासेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांची आढावा बैठक खासदार बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आकुर्डीत बुधवारी झालेल्या बैठकीत 250 जणांनी खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. 150 महिलासह विविध पदाधिकारी यांना पद वाटप करण्यात आले. जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, प्रमुख मावळ शरद हुलावळे, शहर प्रमुख निलेश तरस, महिला जिल्हा संघटिका शैला पाचपुते, पिंपरी-चिंचवडच्या शहर संघटिका सरिता अरुण साने, मा नगरसेविका विमलताई जगताप चिंचवड विधानसभा महिला संघटिका शारदा वाघमोडे, पिंपरी विधानसभा महिला संघटिका शैला निकम, युवासेना पुणे जिल्हाध्यक्ष विश्वजित बारणे देहू शहर प्रमुख सुनील हगवणे आदी उपस्थित होते. ( Pimpri Chinchwad Shiv Sena and Yuva Sena officials review meeting MP Barne present )
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वार राज्यातील जनतेचा कार्यकर्त्यांच्या मोठा विश्वास आहे. त्यामुळेच विविध पक्षातील लोक शिवसेनेत येत आहे. शहरात शिवसेनेची ताकद वाढत आहे. आमच्यावर विश्वास ठेवून कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत येत आहेत. पक्षात आलेल्या कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांना न्याय दिला जाईल. पक्ष संगठना वाढविण्यासाठी कामाला लागा. संघटन मजबूत करायचे आहे. शिवसेना-भाजपचे संघटन वाढीचे काम उत्तमप्रकारे सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही पक्षाचे नियोजनबद्ध काम सुरू आहे. याचा निवडणुकीत मोठा फायदा होईल. राज्य सरकार जनहीताचे विविध निर्णय घेत आहे. सरकारच्या योजनेचा लाभ तळागाळातील जनतेला मिळवून द्यावा, असे आवाहनही खासदार बारणे यांनी केले.
उपजिल्हाप्रमुखपदी बशीर सुतार, चिंचवड विधानसभा प्रमुखपदी संतोष बारणे –
शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी बशीर सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, चिंचवड विधानसभा प्रमुखपदी संतोष बारणे, पिंपरी विधानसभा प्रमुखपदी निखिल येवले,पिंपरी विधानसभा महिला संघटिकापदी शैला निकम, चिंचवड विधानसभा संघटिकापदी शारदा वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा उपप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखा प्रमुख, विभाग संघटिका, शाखा संघटिका, विभाग समनव्यक अशा विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा –
– बालदिन विशेष : ‘मुलांना फुलायचंय अन् पालकांनी फुलवायचंय’, संवादातून उलगडले मुलांचे भावविश्व । Children’s Day 2023
– गतवर्षी 24 रुपये, यंदा इंद्रायणी भाताला किती दर मिळणार? आमदार सुनिल शेळकेंच्या घोषणेकडे सर्वांचेच लक्ष
– शिळींब गावात भरली एसआरटी भात पीक उत्पादन शेतीशाळा; युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद