शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) स्मृतिदिन. आजच्याच दिवशी अर्थात 11 वर्षांपूर्वी दिनांक 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेबांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात शांत झाला. बाळासाहेबांनी घडवलेले असंख्य शिवसैनिक, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर जमा होत असतात. तसेच संपूर्ण राज्यातही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांना अभिवादन केले जाते. तसेच त्यांच्या स्मृतीदिनी अनेक समाजपयोगी उपक्रम केले जातात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्मृतीदिनी मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा इथे शिवसेना शाखा कार्यालयात बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शांताराम भोते यांच्या मार्गदर्शनाखाली सोमाटणे फाटा येथील पायोनिर हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल, बढे हॉस्पिटल, पाटील हॉस्पिटल, साई नर्सिंग होम इथे रुग्णांना फळे – बिस्किटे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, तालुका संघटक शांताराम भोते, तालुका सल्लागार मारुती खोले, उप तालुका प्रमुख युवराज सुतार, युवाअधिकारी अक्षय साबळे, विभाग प्रमुख उमेश दहिभाते, भरत भोते, उपविभाग प्रमुख समीर कराळे, संदिप झांबरे, वाहतूक सेना बाळु शेलार, माजी सरपंच विश्वास घोटकुले, उद्योजक गणेश कदम, हनुमंत घरदले, शाखा प्रमुख शंकर गोपाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आंदर मावळातील रस्त्यासाठी 95 लाखांचा निधी; पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न
– बाळासाहेब ठाकरे यांचा 11वा स्मृतीदिन : शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यातील हे महत्वाचे टप्पे माहितीयेत का? नक्की वाचा
– चंदनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची दिवाळी गोड; लायन्स क्लबकडून शैक्षणिक साहित्यांसह फराळ वाटप