हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लोणावळा शहराच्या वतीने लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत लोणावळा शहर व परिसरातील गरजूंना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. तर सायंकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शुक्रवारी (17 नोव्हेंबर) स्मृतिदिन होता. 11 वर्षांपूर्वी दिनांक 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेबांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात शांत झालेला. बाळासाहेबांनी घडवलेले असंख्य शिवसैनिक, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते दरवर्षी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर जमा होत असतात. तसेच संपूर्ण राज्यातही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांना अभिवादन केले जाते. तसेच त्यांच्या स्मृतीदिनी अनेक समाजपयोगी उपक्रम केले जातात. ( Balasaheb Thackeray Memorial Day Various programs by Shiv Sena Thackeray Group in Lonavla )
लोणावळ्यात शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यासाठी गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, मा. नगरसेवक माणिक मराठे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस निखिल कविश्वर, उप तालुकाप्रमुख एकनाथ जांभूळकर, तालुका सल्लागार मारूती खोले, उप शहरप्रमुख संजय भोईर, उप शहरप्रमुख मनेष पवार, सल्लागार रामभाऊ थरकुडे, शिव वाहतूक सेनेचे पंकज खोले, मा कार्यालय प्रमुख अशोक बोंद्रे, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, विभाग प्रमुख रविंद्र टाकळकर, भगवान देशमुख, रतन मराठे, संजय शिंदे, उल्हास भांगरे, विभाग संघटक शेखर कारके, युवासेना उपतालुका अधिकारी अक्षय साबळे, कुसगावचे सरपंच ज्ञानेश्वर गुंड, उपसरपंच सुरज केदारी, शाखाप्रमुख अमर बराटे, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे, शाखाप्रमुख संजय जाधव, धीरज घारे, शाखाप्रमुख आनंद साठे, शाखाप्रमुख प्रविण कदम, शाखाप्रमुख गणेश जाधव, विद्यार्थी सेनेचे राहुल साठे, उत्तम ठाकर, गणेश तिकोणे व लोणावळा शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा’, राष्ट्रवादी ओबीसी सेलकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पत्र । Pune News
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय! ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी आता मिळणार 25 लाखांचा निधी, वाचा सविस्तर
– आंदर मावळातील रस्त्यासाठी 95 लाखांचा निधी; पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न