ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक च्या वतीने आज, मंगळवार (दि.21-11-2023) रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत सभागृहात ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. याबाबत गावात सर्वत्र नोटीस बजावली असून सदर ग्रामसभेत नागरिकांना करीता असलेल्या योजना तसेच ग्रामपंचायत माध्यमातून होणारी नवीन विकासकामे याविषयीची सविस्तर माहिती नागरिकांना मिळणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ग्रामसभेत प्रामुख्याने नवीन घरकुल, मतदार यादी वाचन, कचरा व्यवस्थापन, गावातील पुढील काळात होणारा विकास यासह अन्य विषयांवर चर्चा व निर्णय घेण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे सदर नियोजित ग्रामसभेत नागरिकांनी उपस्थीत राहावे यासाठी ग्रामसेवक व सरपंच यांच्या सहीनीशी सर्व ठिकाणी नोटीस देखील चिटकवण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामसेवक बांगर यांनी दिली. ( Group Gram Panchayat Gram Sabha Takve Budruk Maval Taluka )
ग्रामसभेत पुढील प्रमाणे घेण्यात येणारे विषय –
१) मागील सभेच्या कामकाजाचा वृत्तांत वाचून कायम करणे.
२) दि.०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप
मतदार यादी वाचन करणे.
३) मोदी आवास घरकुल योजना सन २०२३/२०२४ प्राधान्य
क्रमानुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करणे.
४) घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जागेबाबत चर्चा करणे.
५) सन २०२४/२०२५ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे.
६) माझी वसुंधरा अभियान टप्पा क्र.४ चे नियोजन करणे.
७) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कामांबाबत चर्चा करणे.
८) विकास कामांबाबत चर्चा करणे
अधिक वाचा –
– ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा’, मावळ तालुक्यात भक्तीमय वातावरणात काकड आरती सोहळा सुरू
– सोमाटणे गावात 50 लाख निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न
– ‘…अन्यथा शासनाला गावकारभाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल’, गावखेड्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याची सरपंच परिषदेची मागणी