मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेला सहकार विघ्नहर्ता पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ज्येष्ठ संचालक सुहास गरुड, प्रशांत भागवत, व्यवस्थापक गणेश घारे, शाखा व्यवस्थापक चंद्रकांत पडवळ, वसुली विभागाचे प्रमुख विनायक भेगडे व अमोल भेगडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. श्रीक्षेत्र ओझर इथे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विभागीय सहनिबंधक योगिराज सुर्वे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्कर बांगर, पुणे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, जुन्नर पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ, भोरचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बाळासाहेब तावरे, जुन्नरचे सहायक निबंधक सचिन सरसमकर, आंबेगावचे सहाय्यक निबंध विठ्ठल सूर्यवंशी, सहकारी अधिकारी संतोष भुजबळ, शिरीष पोळेकर, तानाजी कवडे, सुरेखा लवांडे आदी यावेळी उपस्थित होते.
मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे आहेत आणि उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव अविनाश पाटील, खजिनदार विनायक कदम आहेत. संचालक म्हणून रोहिदास गाडे, महेंद्र ओसवाल, समीर खांडगे, राजू खांडभोर, सुहास गरुड, प्रशांत भागवत, रमेश जाधव, वर्षा वाढोकर हे काम पाहत आहेत. ( Sahakar Vighnaharta Award to Mamasaheb Khandge nagari sahakari patsantha )
अधिक वाचा –
– जांबवडे गावच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
– भारताच्या राष्ट्रपती द्रौपती मुर्मू मावळ तालुक्यात येणार, वाचा अधिक
– कोथूर्णे गावातील विविध विकासकामांचे माजी मंत्री बाळा भेगडेंच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण