भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक तथा क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक क्रीडा महोत्सव 2023 – 24 चे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारंभाध्यक्ष संतोष जंगम – अध्यक्ष, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांनी उद्घाटक क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि प्रमुख पाहुणे आस्वाद पाटील यांचे स्वागत केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंतरकुल क्रीडा महोत्सव 2023 – 24 चे आयोजन दि. 2 डिसेंबर 2023 रोजी जनता विद्यालयाच्या कै. मो. श्री. पंत पाटणकर क्रीडांगणावर आयोजित केला गेला. अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात हजारो विद्यार्थी, खेळाडू, पालक आणि क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत विविध मान्यवरांच्या साक्षीने उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी विविध कला आणि क्रीडा कौशल्यांचे प्रात्यक्षिक तथा सादरीकरण करण्यात आले. क्रीडा ज्योतीचे अनावरण, ध्वजारोहण, खेळाडूंचे संचलन मोठ्या दिमाखात पार पडले. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रिडा स्पर्धांमध्ये गुणांकन प्राप्त संस्थेतील खेळाडूंचा गौरव करण्यात आला. ( Cricketer Ravi Shastri inaugurated the annual sports festival Khopoli News )
क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन पर भाषणात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हा सोहळा पाहिल्यावर मला माझे शालेय जीवनातील दिवस आठवल्याचे सांगत क्रीडा स्पर्धेत सहभाग हा महत्त्वाचा असतो, हार जीत ही खेळातील अपरिहार्यता जरी असली तरी त्याकडे न पाहता खेळातून निखळ आनंद मिळवावा असे प्रतिपादन केले. खेळातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, खेळातून शिस्त अंगी भिणते, यश पचविण्याच्या वृत्ती सोबत पराभव स्वीकारण्याची मानसिकता विकसित होते असेही त्यांनी सांगितले.
या महोत्सवात सहभागी होणाऱ्या क्रीडा रसिकांना शुभेच्छा देताना चक्क मराठीत “खेळाचा सन्मान करा, आनंद लुटा” आणि हजारो खेळाडूंना “जिंका” असे त्यांनी आवाहन केल्यावर टाळ्यांच्या गजरात त्यांनी वाहवा मिळवली. संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. या निमित्ताने संस्थेचे आजी-माजी संचालक आणि विविध क्षेत्रातले पदाधिकारी भव्य व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या विविध विभागाचे पदाधिकारी, प्राचार्य , प्राध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या महोत्सवाच्या भव्यदिव्य संपन्नतेत सहभाग नोंदवला.
अधिक वाचा –
– दैनिक मावळ विशेष । नोकरी अन् नृत्यसाधनेचा साधलाय सुंदर मेळ; महापालिकेतील कर्मचारी मिलिंदची नृत्यसाधना
– सुदुंबरेतील श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ विकास आराखड्यासाठी 66 कोटींचा निधी
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळेगाव शहराध्यक्षपदी संतोष भेगडे; वरिष्ठ उपाध्यक्षपदी गणेश काकडे