राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा निकाल नोव्हेंबर महिन्यात लागला. त्यानंतर आता संबंधित गावांत सरपंचासह उपसरपंच यांचीही निवड पार पडल्याचे दिसत आहे. सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो. निवडणूकीद्वारे त्याला 5 वर्षांसाठी निवडले जाते. सरपंचाला मुखिया, प्रधान, ग्रामसभा अध्यक्ष म्हणून ओळखले जाते. पण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत प्रमुखाला सरपंच असे म्हणतात. दरम्यान निवडणूकांमधून निवडून येणाऱ्या सरपंच आणि निर्वाचित उपसरपंच यांना किती पगार असतो? हे तुम्हाला माहिती आहे का? या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात…. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वर्ष 2021 मध्ये राज्य शासनाने सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधन मोबदल्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधितांच्या मानधनासाठी ग्रामपंचायतीची लोकसंख्या विचारात घेतली जाते. सरपंचाचा पगार गावच्या लोकसंख्येनुसार ठरतो. त्यामुळे सरपंच असला तरीही प्रत्येकाचा पगार कमी किंवा जास्त असू शकतो. गावाची लोकसंख्या जितकी जास्त तेवढा सरपंचाचा पगार जास्त असतो. सरपंचाला कमीत कमी 3000 तर जास्तीत जास्त 5 हजार रुपयापर्यंत पगार/मानधन दिला जातो. ( What is salary of Gram Panchayat Sarpanch Upasarpanch and members Information in Marathi )
गावाची लोकसंख्या आणि सरपंच – उपसरपंच यांचे मानधन :
- ज्या गावाची लोकसंख्या 0 ते 2000 असेल त्या गावच्या सरपंचाचे मानधन प्रति महिना 3 हजार रुपये इतके असते. तर त्या गावच्या उपसरपंचाला 1 हजार रुपये प्रति महिना मानधन मिळते. यासोबतच त्यांना सरकारी अनुदानाची 75 टक्के रक्कम मिळते. सरपंचाला 2 हजार 250 रुपये तर उपसरपंचाला 750 रुपये अनुदानाची रक्कम मिळते.
ज्या गावाची लोकसंख्या 2001 ते 8000 असेल, त्या गावच्या सरपंचाचे मानधन प्रतिमहिना 4 हजार असेल. तर त्या गावच्या उपसरपंचाला 1500 रुपये प्रति महिना मानधन मिळते. यासोबतच त्यांना सरकारी अनुदानाची टक्केवारी 75 टक्के रक्कम मिळते. सरपंचाला 3000 रुपये, तर उपसरपंचाला 1125 रुपये अनुदान रक्कम मिळते.
ज्या गावाची लोकसंख्या 8 हजार पेक्षा जास्त असेल, त्या गावातील सरपंचाला 5 हजार मानधन दिले जाते, तर 3 हजार 750 इतके सरकारी अनुदान मिळते. तर उपसरपंचाला 2 हजार इतके मानधन आणि 1500 इतके अनुदान दिले जाते. यापूर्वी ह्या सरपंचाला 4 हजार, तर उपसरपंचाला 2 हजार इतके मानधन दिले जायचे.
ग्रामपंचायत
लोकसंख्येनुसार सरपंचाला ३०००, ४०००, ५००० तर उपसरपंचाला १०००, १५००, २००० प्रती महिना मानधन.
वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारचा पैसा थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होतो.
सरपंच आणि ग्रामसेवक दोघांच्या ताब्यात गावाची तिजोरी, विकास आणि जनतेच्या नाड्या असतात.
— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) December 12, 2023
सरपंच – उपसरपंच यांचा पगार थेट खात्यात जमा –
नवीन सुधारणेनुसार सरपंच आणि उपसरपंच यांचा पगार राज्य शासनाकडून थेट सरपंच – उपसरपंच यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. यामध्ये त्यांचे मानधन आणि बैठक भत्ता यांचा समावेश असतो. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींच्या प्रभारी सरपंच, उप-सरपंच यांना दिले जाणारे मासिक मानधन थेट ऑनलाइन बँकेत जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे सरपंच, उपसरपंच यांचे मानधन आणि बैठक भत्ताही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणे थेट बँकेत जमा होतो.
सदस्यांना किती मानधन मिळते?
ग्रामपंचायतीचे सदस्यांना शासनाच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठलेही वेतन किंवा मानधन दिले जात नाही. प्रत्येक महिन्यामध्ये एक मासिक सभा आयोजित केली जाते. अशा वार्षिक 12 सभा घेण्यासाठी ग्रामपंचायतीला परवाना आहे. अशा 12 सभेच्या उपस्थितीसाठी प्रत्येक सभेला दोनशे रुपये पर्यंतचा भत्ता सदस्यांना दिला जातो.
अधिक वाचा –
– शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना मिळणार आकर्षक भेट
– लोणावळ्यात मनसे आक्रमक! रेल्वेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनसैनिकांचे रेल रोको आंदोलन
– मावळमधील कशाळ व भोयरे गावात मंगळवारी, तर कल्हाट व निगडे गावात बुधवारी ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे’ आयोजन