कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना असलेला मावळ फेस्टिवल दिनांक 26 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत पार पडणार आहे. मावळ फेस्टिवलचे यंदाचे हे 16वे वर्ष आहे. मावळ फेस्टिवलच्या अध्यक्षपदी यावेळी सुरेश शामराव जांभूळकर यांची निवड करण्यात आली आहे. फेस्टिवलचे संस्थापक प्रवीण चव्हाण, गुलाबराव म्हाळसकर, किरण म्हाळसकर, मावळते कार्यक्रम प्रमुख ॲड. पवन भंडारी आणि संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शुक्रवार दिनांक 26 जानेवारी ते रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 दरम्यान मावळ फेस्टीवल संपन्न होईल. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी वडगांव मावळ आणि परिसरातील नागरिकांना मनोरंजनाची मेजवानी यातून मिळणार आहे. सामाजिक उत्तरदायित्व जपत तसेच दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा मिळण्यासाठी अधिकाधिक चांगले कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, अशी माहिती प्रवीण चव्हाण यांनी दिली. याप्रसंगी विवेक धर्माधिकारी, नामदेवराव ढोरे, नितीन कुडे, अरुण वाघमारे, शैलेंद्र ढोरे, रवींद्र काकडे, शंकरराव भोंडवे, भूषण मुथा, सागर जाधव, विनायक भेगडे आदी संचालक उपस्थित होते. ( Suresh Jambhulkar Appointed President of Maval Festival Vadgaon )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील कल्हाट आणि निगडे गाव ‘इको-सेन्सिटिव्ह’ झोनमधून वगळा; खासदार श्रीरंग बारणेंची मागणी
– ‘ईपीएस’ धारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी
– मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांच्या निकृष्ट कामांबाबत आमदार सुनिल शेळकेंची अधिवेशनात लक्षवेधी! पाहा व्हिडिओ