वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूकीत निवडणूक आलेल्या सरपंच, सदस्य यांनी आमदार सुनिल शेळके यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत गावाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम करा, अशी सुचना यावेळी आमदार शेळकेंनी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वाकसईच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सोनाली मनोज जगताप यांनी नवनिर्वाचित सदस्यांसह आज, सोमवार (दि. 25 डिसेंबर) आमदार सुनिल शेळके यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार शेळकेंनी सरपंचांचा सन्मान करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच नवनियुक्त सदस्य मारुती भरत येवले, शाम खंडू विकारी, जयश्री दिपक काशीकर, भारत मुकुंद देसाई, रुपाली सूर्यकांत शेलार, जयश्री गणेश देशमुख, सुरेश धोंडू केदारी यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जेष्ठ नेते भरत येवले, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा दिपाली गराडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ( Newly elected Sarpanch member of Vaksai Group Gram Panchayat met MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
– दैनिक मावळ ‘संवाद’ : ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ पुस्तकाचे लेखक श्रीकांत चौगुले यांच्यासोबत खास बातचीत
– नाताळ सण विशेष : सांताक्लॉज नक्की कोण असतो? भगवान येशू ख्रिस्त, ख्रिसमस सण आणि सांताक्लॉजचं नातं काय? नक्की वाचा
– मोठी बातमी! काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द