व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील ‘दादा’ गटाची ताकद दिसणार! राष्ट्रवादीकडून आंदर मावळ विभागात शुक्रवारी स्नेह मेळाव्याचे आयोजन

आमदार सुनिल शेळके यांच्या संकल्पनेतून आंदर मावळ विभागात फळणे फाटा इथे राष्ट्रवादी परिवार स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 28, 2023
in लोकल, ग्रामीण
NCP-Party-Flag

File Image - NCP Party


मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांकडून उद्या, अर्थात शुक्रवारी (दिनांक 29 डिसेंबर 2023) दुपारी 4 वाजता आमदार सुनिल शेळके यांच्या संकल्पनेतून आंदर मावळ विभागात फळणे फाटा इथे राष्ट्रवादी परिवार स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आंदर मावळ भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, बंधू भगिनी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा स्नेह मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आंदर मावळ विभागातील सुदवडी, सुदुंबरे, जांबवडे, नवलाख उंब्रे, जाधववाडी, मिंडेवाडी, बधलवाडी, परीटवाडी, मंगरुळ, शेटेवाडी, शिरे, खुरसुलेवाडी, आंबळे, कदमवाडी, निगडे, कल्हाट, पवळेवाडी, कोंडिवडे, भोयरे, कशाळ, किवळे, पिचडवाडी, इंगळूण, पारीठेवाडी, मानकली, अनसुटे, कुणे, कुणेवाडी, माळेगाव खुर्द, पिंपरी, तळपेवाडी, माळेगाव बु., सावळा, कळकराई, आढारवाडी, मेटलवाडी, गोंटेवाडी, ढोंगेवाडी, निळशी, निसाळवाडी, खांडी, कुसूर, मोरमारेवाडी, चिरेखान, लोहटवाडी, बेंदेवाडी, लालवाडी, डाहूली, कांब्रे, बोरवली, कुसवली, वहानगाव, नागाथली, शिंदेवाडी, घाटेवाडी, वडेश्वर, लष्करीवाडी, गभालेवाडी, डोंगरवाडी, सटवाईवाडी, धनगरपठार, माऊ, दवणेवाडी, फळणे, टाकवे बुद्रुक, बेलज, राजपुरी या गावातील नागरिकांच्या समस्या या मेळाव्यात जाणून घेतल्या जाणार आहेत. ( Big Rally Organized By NCP Ajit Pawar Group In Andar Maval on Concept of MLA Sunil Shelke )

तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले की, ‘मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) वतीने ‘संकल्प दूरदृष्टीचा सर्वागीण विकासाचा’ ही थीम घेऊन आंदर मावळातील गावभेट दौरा घेतला होता. या दौऱ्यात स्थानिक गावकऱ्यांनी सार्वजनिक विकासाची कामे सुचवली होती. तसेच वैयक्तिक अडचणी, विविध शासकीय योजनांचा लाभ या विषयाचे प्रस्ताव दिले होते. या सर्व बाबींचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपमुख्यंमंत्री अजित पवार व आमदार सुनिल शेळके यांना दिला होता. या अहवालातील विविध समस्यांची सोडवणूक झाली आहे. तर विविध विकास कामे मार्गी लागली आहे.’

राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष प्रदीप गारटकर, आमदार सुनिल शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, माजी सभापती बाबूराव वायकर, माजी सभापती अतिष परदेशी यांच्यासह मावळ तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि मान्यवर मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. आंदर मावळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– मावळ लोकसभा लढवण्यासाठी अजितदादांचा ‘विश्वासू नेता’ राष्ट्रवादी सोडणार? ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? वाचा सविस्तर
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मावळचे माजी आमदार स्व. दिगंबर (दादा) भेगडे यांच्या स्मारकाचे लोकार्पण!
– महत्वाची बातमी! कोर्टाकडून आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण मान्य, शेकडो मराठा उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा


dainik maval jahirat

Previous Post

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आज वडगावात 1 कोटी 10 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

Next Post

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला पिस्तूल आणि जीवंत काडतूसासह रंगेहात अटक; लोणावळा पोलिसांची कारवाई

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
lonavala-gramin-police

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला पिस्तूल आणि जीवंत काडतूसासह रंगेहात अटक; लोणावळा पोलिसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.