व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा : अयोध्येतील अक्षता पोहोचणार घराघरात, पिंपरी चिंचवड शहरात महाअभियान । Ram Mandir Ayodhya

श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पिंपरी चिंचवड समितीतर्फे शहर संयोजक धनंजय गावडे, सहसंयोजक महेश्वर मराठे, विश्व हिंदू परिषद पुणे विभाग मंत्री नितीन वाटकर यांनी ही माहिती दिली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 31, 2023
in पुणे, ग्रामीण, शहर
Shri-Ram-Mandir-Pran-Pratishtan

Photo Courtesy : Team Dainik Maval


अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा २२ जानेवारी २०२४ रोजी होते आहे. यानिमित्त श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्यातर्फे पिंपरी चिंचवड समितीच्यावतीने दि.१ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत शहरातील घरोघरी जावून श्रीरामलला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अयोध्या येथील पूजित मंगल अक्षता वितरण करण्यात येणार आहे. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासह देहू, आळंदी, देहूरोड कॅन्टोन्मेंट, हिंजवडी ग्रामपंचायत परिसरात हे निमंत्रण महाअभियान होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पिंपरी चिंचवड समितीतर्फे शहर संयोजक धनंजय गावडे, सहसंयोजक महेश्वर मराठे, विश्व हिंदू परिषद पुणे विभाग मंत्री नितीन वाटकर यांनी ही माहिती दिली. या निमित्ताने संपूर्ण देश, शहर पुन्हा राममय व्हावे, या हेतूने श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासातर्फे, पिंपरी चिंचवड समितीने हे अभियान आयोजित केले आहे. या अभियानातंर्गत या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडकरांना अयोध्येतील रामललाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने शहरातील हजारो रामसेवक १ ते १५ जानेवारी २४ दरम्यान घरोघरी जातील. ( Shri Ram Mandir Pran Pratishtan Sohla Ayodhya Akshata Allocation Campaign In Pimpri Chinchwad )

शुभकार्याचे निमंत्रण देण्याच्या परंपरेप्रमाणे अक्षता, सोबत निमंत्रण, मंदिराच्या माहितीचे आणि मंदिराच्या प्रतिमेचा फोटो देतील. प्रतिष्ठापनेच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याचे, व्यापक स्तरावर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे व राममंदिर निर्मितीच्या स्वप्नपूर्तीचा अनुभव घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत् २०८०, अर्थात सोमवार, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व देशभरातील धार्मिक, सामाजिक, आर्थिक, उद्योग, कला, क्रीडा, विज्ञान, आरोग्य, साहित्य आदी विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड मधील देखील मान्यवरांचा समावेश आहे.

अयोध्येतून आणलेल्या मंगल अक्षता पूजनाचे कार्यक्रम संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातही आयोजित करण्यात आले जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज संस्थान देहू, माऊली संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, मोरया गोसावी मंदिर चिंचवड, इस्कॉन मंदिर रावेत,संत गजानन महाराज मंदिर सांगवी येथे कलशपूजानाने या उपक्रमाला सुरवात झाली त्यानंतर टप्प्या-टप्प्याने पिंपरी चिंचवड शहरातील २५०० वर स्थानी अक्षता पूजनाचे कार्यक्रम, कलश यात्रा संपन्न झाल्या यामध्ये साधारण आठ लाखांवर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कलशाचे दर्शन घेतले. या अक्षता पूजनासाठी समाजाच्या सर्व स्तरातील घटकांचा समावेश असलेल्या समित्यांची स्थापना करण्यात आली असून, या समित्या आपापल्या भागात अक्षता वितरण करतील.

विविध कार्यक्रमांचे आयोजन –

१ ते १५ जानेवारी २४ दरम्यान गृहसंपर्क अभियान संपन्न झाल्यानंतर सोमवार २२ जानेवारी रोजी पर्यंत पिंपरी चिंचवड शहरात श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पिंपरी चिंचवड समितीतर्फे अनेकविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व मंदिरांमध्ये भजन, रामनाम जप, आरती, रांगोळी, संगीत, नृत्यकलासह विविध कलांचे कार्यक्रम, सोसायट्या, वाड्या वस्त्या, कॉलनी, प्रतिष्ठाने, मंडळांमध्ये रामसंकीर्तन होणार आहे. या आनंदोत्सवात पिंपरी चिंचवडकर नागरिक- बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– कौतुकास्पद! मावळच्या सुपुत्राची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड । Chaitanya Kondbhar
– पुन्हा होणार विठू नामाचा जागर! कामशेत इथे 1 जानेवारीपासून कीर्तन महोत्सव, ‘हे’ प्रसिद्ध कीर्तनकार करणार कीर्तनसेवा । Maval Kirtan Festival
– ‘बीआरटी थांब्यांची दुर्दशा, प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर’ : पिंपरी-चिंचवडमधील बीआरटी मार्गांवरील विदारक परिस्थिती । Dainik Maval Special Report


dainik maval jahirat

Previous Post

थर्टी फर्स्टची पार्टी जीवावर बेतली, इंद्रायणी नदी पात्रात बुडून 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू । Talegaon News

Next Post

‘विकसित भारत संकल्प’ यात्रेची पुणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी; ग्रामीण भागात यात्रेला 4 लाख नागरिकांची भेट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Viksit-Bharat-Sankalp-Yatra

‘विकसित भारत संकल्प’ यात्रेची पुणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी; ग्रामीण भागात यात्रेला 4 लाख नागरिकांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.