व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ कीर्तन महोत्सवाला उत्साहात सुरुवात; पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने वारकरी-भाविक श्रोते उपस्थित । Kirtan Festival

श्री विठ्ठल परिवार मावळ आयोजित भव्य कीर्तन महोत्सवाला सोमवारी, दि. 1 जानेवारी रोजी उत्साहात सुरुवात झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 2, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
maval-Kirtan-festival

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


श्री विठ्ठल परिवार मावळ आयोजित भव्य कीर्तन महोत्सवाला सोमवारी, दि. 1 जानेवारी रोजी उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कीर्तनापूर्वी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या उत्सव सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी पंचक्रोशीतील हजारो महिला पुरुष भाविक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. सोमवारी कीर्तन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तर शास्त्री (पारनेर) यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. श्री विठ्ठल परिवार मावळ, कीर्तन सप्ताह मैदान – कामशेत इथे हा कीर्तन सोहळा दिनांक 5 जानेवारीपर्यंत रंगणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील सर्वात मोठ्या कीर्तन महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. किर्तन महोत्सवाचे यंदा सहावे वर्ष असून कामशेत येथे साजऱ्या होणाऱ्या भव्य कीर्तन महोत्सवात यावर्षीही महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची दररोज सायंकाळी सहा वाजता सुश्राव्य कीर्तने होणार आहेत. मावळातील कानाकोपऱ्यातून विशेषत: ग्रामीण भागातून भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत असतात. या कार्यक्रमासाठी कामशेत येथील मैदानात भव्य मंडप पार्कींग व्यवस्थेसह उभारण्यात आला आहे. ( Kirtan festival organized by MLA Sunil Shelke Shri Vitthal Parivar Maval at Kamshet )

सोमवार, 1 जानेवारीला एकनाथ महाराज चत्तर, मंगळवार 2 जानेवारीला विशाल महाराज खोले, बुधवार 3 जानेवारीला बाळू महाराज गिरगावकर, गुरुवार 4 जानेवारीला योगीराज महाराज गोसावी तसेच कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवार 5 जानेवारीला अक्रूर महाराज साखरे यांचे सकाळी 10 ते 12 यावेळेत काल्याचे किर्तन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन किर्तन श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

अधिक वाचा –
– ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेची पुणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी; ग्रामीण भागात यात्रेला 4 लाख नागरिकांची भेट
– श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा : अयोध्येतील अक्षता पोहोचणार घराघरात, पिंपरी चिंचवड शहरात महाअभियान । Ram Mandir Ayodhya
– ब्रेकिंग! थर्टी फर्स्टची पार्टी जीवावर बेतली, इंद्रायणी नदी पात्रात बुडून 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू । Talegaon News


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव फाटा चौकाचे छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण, नववर्षाच्या मुहूर्तावर फलकाचे अनावरण । Talegaon Dabhade

Next Post

शिवसेना शिंदे गट फुंकणार मावळ लोकसभेचे रणशिंग? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शनिवारी मतदारसंघात जाहीर सभा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
cm-eknath-shinde-and-mp-shrirang-barne

शिवसेना शिंदे गट फुंकणार मावळ लोकसभेचे रणशिंग? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शनिवारी मतदारसंघात जाहीर सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.