व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवसेना शिंदे गट फुंकणार मावळ लोकसभेचे रणशिंग? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शनिवारी मतदारसंघात जाहीर सभा

मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवसेना उपनेते श्रीरंग बारणे यांची माहिती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 2, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
cm-eknath-shinde-and-mp-shrirang-barne

Photo Courtesy : MP Shrirang Barne


शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाला पुण्यातून सुरुवात होणार आहे. येत्या शनिवारी (दि.6) सायंकाळी साडेचार वाजता किवळे येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा होणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यभर राबविला. या उपक्रमामुळे राज्यातील जनतेला एकाच छताखाली विविध कागदपत्रे मिळाली. थेरगाव, मावळमध्ये देखील हा उपक्रम झाला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात गेले. लोकांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या. ( Maval Lok Sabha Constituency Election 2024 CM Eknath Shinde Rally at Kiwale )

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे राज्याचा दौरा करत आहेत. शिवसेनेचे खासदार असलेल्या, मागीलवेळी शिवसेनेने निवडणूक लढविलेल्या मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे जाणार आहेत. त्यांच्या शिवसंकल्प अभियानाला पुण्यातून सुरुवात होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा किवळेतील मुकाई चौकात शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.

अधिक वाचा –
– महात्मा फुले जन आरोग्य योजना तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचवणार; मावळ तालुका काँग्रेसकडून नवी आरोग्य मोहीम । Maval News
– ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेची पुणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी; ग्रामीण भागात यात्रेला 4 लाख नागरिकांची भेट
– श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा : अयोध्येतील अक्षता पोहोचणार घराघरात, पिंपरी चिंचवड शहरात महाअभियान । Ram Mandir Ayodhya


Previous Post

मावळ कीर्तन महोत्सवाला उत्साहात सुरुवात; पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने वारकरी-भाविक श्रोते उपस्थित । Kirtan Festival

Next Post

आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते बहुउद्देशीय मोरया दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-maval-news

आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते बहुउद्देशीय मोरया दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.