व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बापरे बाप! लोणावळा उपविभागात तब्बल 510 वाहन चालकांवर कारवाई, 3 लाख 61 हजारांचा दंड वसूल । Lonavala News

सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्याच्या अनुषंगाने लोणावळा शहर आणि परिसरात होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता यंदा लोणावळा उपविभागात पोलिस प्रशासनाकडून चांगले नियोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 3, 2024
in लोकल, शहर
lonavala-subdivision-police

Photo Courtesy : Team Dainik Maval


सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्याच्या अनुषंगाने लोणावळा शहर आणि परिसरात होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता यंदा लोणावळा उपविभागात पोलिस प्रशासनाकडून चांगले नियोजन करण्यात आले होते. तगडा पोलिस फौजफाटा आणि अनेक स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांच्या मदतीने लोणावळा उपविभागात पोलिसांनी 30 व 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी परफेक्ट बंदोबस्त केला होता. त्यामुळेच हुल्लडबाजी करणे, दारू पिऊन गाड्या चालवणे, विनाकारण गोंधळ घालणे, वाहतूकीचे नियम मोडणे असे प्रकार यंदा कमी झाल्याचे दिसून आले. समोर आलेल्या माहितीनुसार यंदा 30 आणि 31 डिसेंबर रोजी लोणावळा उपविभागात पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी तसेच वाहतूकीचे नियम मोडल्याप्रकरणी 510 केसेस दाखल केल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

प्राप्त माहितीनुसार, लोणावळा उपविभागात पोलिसांनी दिनांक 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर 2023 रोजी ड्रंक अँड ड्राईव्ह आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रकरणी कठोर कारवाई केली. त्यानुसार उपविभागातील वडगाव मावळ पोलिस ठाणे, लोणावळा शहर पोलिस ठाणे, लोणावळा ग्रामीण पोलिस ठाणे आणि कामशेत पोलिस ठाणे इथे एकूण 510 केसेसची नोंद करण्यात आली असून तब्बल 3 लाख 61 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी ही माहिती दिली. ( Action against 510 drivers for drunk and drive cases and violation of traffic rules in lonavala subdivision )

पोलिस स्टेशननिहाय कारवाईची माहिती –
1. वडगाव मावळ पोलिस स्टेशन

ड्रंक अँड ड्राईव्ह माहिती – 03
एकूण केसेस – 63
एकूण दंड – 52,500 रुपये

2. लोणावळा शहर पोलीस स्टेशन
ड्रंक अँड ड्राईव्ह माहिती – 0
एकूण केसेस – 361
एकूण दंड – 2,61,300 रुपये

3. लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन
ड्रंक अँड ड्राईव्ह माहिती – निरंक
एकूण केसेस – 20
एकूण दंड – 10,000 रुपये

Novel NIBR Ads

4. कामशेत पोलीस स्टेशन
ड्रंक अँड ड्राईव्ह माहिती – 02
एकूण केसेस – 66
एकूण दंड – 37,700 रुपये

लोणावळा उपविभागामध्ये एकूण
ड्रंक अँड ड्राईव्ह केसेस – 05
एकूण केसेस – 510
एकूण दंड – 3,61,500

अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते बहुउद्देशीय मोरया दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन । Vadgaon Maval
– शिवसेना शिंदे गट फुंकणार मावळ लोकसभेचे रणशिंग? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शनिवारी मतदारसंघात जाहीर सभा
– मावळ कीर्तन महोत्सवाला उत्साहात सुरुवात; पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने वारकरी-भाविक श्रोते उपस्थित । Kirtan Festival


dainik maval jahirat

Previous Post

मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्व्हेक्षणाचे काम बिनचूक व्हावे – मुख्यमंत्री । Maratha Reservation

Next Post

पवनानगर येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा । Pavananagar

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sankalp-School-Pavanagar Maval

पवनानगर येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये 'बालिका दिन' उत्साहात साजरा । Pavananagar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.