व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळसह पुणे जिल्ह्याचे नाव जगभर गाजवणारी सुवर्णकन्या तृप्ती निंबळे! वाचा वारू गावच्या लेकीचा आदर्शवत क्रीडाप्रवास

पवन मावळ भागातीस अत्यंत दुर्गम अशा वारु गावातील गुणवान खेळाडू तृप्ती शामराव निंबळे हिने नेपाळ इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 4, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Trupti

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील पवन मावळ भागातीस अत्यंत दुर्गम अशा वारु गावातील गुणवान खेळाडू तृप्ती शामराव निंबळे हिने नेपाळ इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई करुन प्रथम क्रमांक पटकावला आहे. याआधी तृप्तीने इतरही अनेक देशांमध्ये जाऊन थायबॉक्सिंग क्रीडा प्रकारात सुवर्णपदके मिळवली आहेत. परंतू, तिच्या आताच्या यशाबद्दल तृप्तीचे सर्वत्र कौतूक होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तृप्तीचा आदर्शवत क्रीडाप्रवास –
2018 साली पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील, मध्य प्रदेशातील खांडवा येथे झालेल्या 2017 मध्ये तृप्तीने थायबॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. तर भुतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. आसाम इथे याच स्पर्धेत रजत पदक मिळवले आहे. गोवा येथे आंतराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. तर याआधी अनेक स्पर्धेत तब्बल 69 पदके मिळवले आहे. तृप्ती तिला अनेक स्पर्धेत भारत देशाचे नाव देशाच्या विविध देश पातळीवर उचवायचे असल्याचे तिने सांगितले आहे. ( Thai Boxing Player Trupti Shyamrao Nimble From Varu Village Of Maval Taluka In Pune District )

तृप्ती हि उच्च माध्यमिक विद्यालय संगमनेर येथे शिक्षण पुर्ण केले असून ती आता क्रीडा शिक्षण विभागात नोकरी करत आहे. तृप्तीला खेळाचे बाळकडू हे घरातुनच मिळाले आहे. तिचे वडिल हे पुणे जिल्ह्यातील कुस्तीक्षेत्रातील मल्लसम्राट शामराव निंबळे अशी ओळख आहे. शामराव निंबळे यांना तीन मुली प्रिती, करिष्मा आणि तृप्ती तर आई गृहणी जिजाबाई आहे. तिचा भाऊ हा कुस्तीक्षेत्रातच होता.

भावाच्या अपघाती निधनानंतर तृप्तीने केला निर्धार –

सन 2014 मध्ये तृप्तीच्या भावाचे आपघाती निधन झाले. याबद्दल बोलताना तृप्तीने सांगितले की, “मला माझ्या भावाचे व वडिलांचे राहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी खेळायचे आहे. आजवर मी अनेक पदके मिळवलीयेत. पण यापुढेही खेळत राहणार असून यापुढेही देशासाठी पदके मिळवणार आहे.” असे तिने सांगितले आहे. तृप्तीची मोठी बहिण करिष्मा सनी बारणे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करत आहे. तृप्तीमुळे संपूर्ण मावळ सह पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हाचे नाव लौकीक झाले आहे. तृप्तीला क्रीडा शिक्षक टि. वाय. अत्तर याचे मार्गदर्शन लाभले आहे.

“महिलांनी क्रिडा क्षेत्रात काम करुन आपल्या भारत देशाचे नाव पुढे घेऊन जावे व एकदा क्रिडा क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणी येत असतात. पंरतु त्या अडचणींना सामोरे जाण्याची तयारी आपल्या मनामध्ये ठेवावी लागते. त्यामुळे मी आज विविध राज्य व देशभरात खेळून आले असल्याने मला या सर्व गोष्टींचा अनूभव आहे. मी यापुढेही देशासाठी खेळत राहणार आहे व माझ्या भारत देशाचे नाव जगाच्या नकाशावर कोरणार आहे. मला यापुढे शासकीय अधिकारी बनून देशसेवा करण्याची इच्छा आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.” – तृप्ती शामराव निंबळे

अधिक वाचा –
– पिंपरी चिंचवड शहरात विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद; तब्बल 36 हजार नागरिकांनी घेतला सहभाग । Viksit Bharat Sankalp Yatra
– पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया । Pune News
– इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी । Savitribai Phule Jayanti


Previous Post

पुढील 5 वर्षासाठी केलेल्या वाढीव कर मूल्यांकनाबाबत वडगाव नगरपंचायत प्रशासनाने पुनर्विचार करण्याची मागणी । Vadgaon Nagar Panchayat

Next Post

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान, वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maharashtra-cabinet-decision

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान, वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.