आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते बुधवारी (दि. 10 जानेवारी) करुंज-बेडसे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार सुनिल शेळके समवेत करुंज-बेडसेचे सरपंच सदाशिव शेंडगे, उपसरपंच काळूराम बरदाडे, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘गावातील मुख्य रस्त्यासह अंगणवाडी इमारत, तलाठी कार्यालय इमारत,सभामंडप, जि.प.शाळा वर्ग खोल्या दुरुस्ती,व्यायामशाळा साहित्य, अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण, पाणीपुरवठा योजना इ. कामांसाठी निधी उपलब्ध केला आहे. कामे दर्जेदार व्हावीत याकडे लक्ष द्या. सर्वसमावेशक कामांतून गावाचा विकास साधा. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ सर्वांनी एकत्र येऊन आपले गाव सुंदर व आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करा. जी कामे राहिली असतील त्या विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहील,’ असे आमदार सुनिल शेळके यांनी बोलताना सांगितले. ( bhoomipujan of various development works under Karunj Bedse gram panchayat MLA Sunil Shelke )
माजी उपसरपंच नितीन मुऱ्हे, मनोज येवले, चंद्रकांत दहिभाते, अविनाश गराडे, रवींद्र घारे, बबन तुपे, गोरख हिंगे, अजित चौधरी, ग्रामपंचायत सदस्य अतुल शेंडगे, शाहिदास दहिभाते, संतोष जाधव, कल्पना कांबळे, अश्विनी शिंदे, सुरेखा राऊत, सीमा दहिभाते, स्वाती पवार, दत्तात्रय दहिभाते, भाऊसाहेब दहिभाते, अर्जुन शेंडगे, गणपत पवार, किसन वाळुंज, बाळासाहेब मोहोळ तसेच आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ आदीजण यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखडा सादर करा; पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांचे निर्देश । Ajit Pawar
– महत्वाचे! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा ब्लॉक, पाहा कुठे आणि किती कालावधीसाठी असेल ट्राफिक ब्लॉक । Mumbai Pune Expressway
– पुणे-लोणावळा दरम्यान सोमवारपासून दुपारच्या वेळेत लोकल धावणार, रेल्वे बोर्डाचा निर्णय; खासदार बारणेंची माहिती