मावळ तालुक्यातील महसूल मंडळांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यात आता आधी असलेल्या 7 महसूल मंडळांमध्ये वडेश्र्वर, परंदवडी, टाकवे बुद्रुक, टाकवे खुर्द व कुसगाव बुद्रुक अशा 5 नवीन महसूल मंडळांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील महसूल मंडळांची संख्या दुपटीने वाढून ती 12 महसूल मंडळे इतकी झाली असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यात याआधी वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, खडकाळा, काले, शिवणे, कार्ला व लोणावळा अशी 7 महसूल मंडळ कार्यरत होती. या 7 मंडळांच्याअंतर्गत 71 सजांचा कारभार चालत होता. दरम्यान दिनांक 15 फेब्रुवारी 2018 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी काढलेल्या अंतिम अधिसूचनेनुसार तब्बल 6 वर्षांनी महसूल मंडळांच्या पुनर्रचनेची ही कार्यवाही झाली आहे. ( reorganization of revenue mandals in maval taluka 5 new mandal were created )
- तालुक्यातील मंडल अधिकारी कार्यालयांचे विभाजन होऊन विस्तारीकरण झाल्यामुळे मंडळ अधिकाऱ्यांवर असणारा कामाचा ताण कमी होणार आहे. तसेच, तालुक्यातील नागरिकांना मंडल अधिकारी कार्यालय आपल्याजवळ आल्याने त्यांची गैरसोय दूर होऊन वेळ, पैसा यांची बचत होणार आहे. संबंधित नवीन महसूल मंडळांसाठी मंडल अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली असून लवकरच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे, असेही तहसीलदारांनी सांगितले.
तालुक्यातील एकूण मंडल विभाग आणि त्यात समाविष्ट सजा खालीलप्रमाणे;
- वडगाव मावळ – वडगाव, कातवी, नवलाख उंबरे, बधलवाडी, आंबळे, निगडे
- तळेगाव दाभाडे – तळेगाव, वराळे, आंबी, इंदोरी, सोमाटणे
- खडकाळा – खडकाळा, कुसगाव खुर्द, कान्हे, नायगाव, जांभूळ, साते
- कार्ला – कार्ला, वेहेरगाव, मळवली, औंढे खुर्द, ताजे
- काले – काले, मोरवे, चावसर, दुधीवरे, शिळींब, जोवण, कोथूर्णे, करुंज
- लोणावळा – लोणावळा, खंडाळा, कुणे नामा, उढेवाडी, कुरवंडे, भुशी
- शिवणे – शिवणे, चांदखेड, दिवड, बौर, शिवली, करूंज, आढले बुद्रुक
- वडेश्र्वर (नवीन) – वडेश्वर, नागाथली, कशाळ, खांड, किवळे, इंगळून, माळेगाव बुद्रुक
- टाकवे बुद्रुक (नवीन) – टाकवे बुद्रुक, माऊ, करंजगाव, घोणशेत, नाणे, कांब्रे नामा
- टाकवे खुर्द (नवीन) – टाकवे खुर्द, थोराण, खांडशी, पाथरगाव
- परंदवडी (नवीन) – परंदवडी, दारूंब्रे, उर्से, गहुंजे
- कुसगाव बुद्रुक (नवीन) – कुसगाव बुद्रुक, नांगरगाव, डोंगरगाव, वरसोली, वलवण, तुंगार्ली, वाकसई
अधिक वाचा –
– पवना आणि टाटा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर विशेष बैठक संपन्न । Maval News
– करुंज-बेडसे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण
– मोठा निर्णय! पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत आता भूमिहिनांना मिळणार 1 लाखांचे अनुदान