व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोरया प्रतिष्ठानच्या पतंग महोत्सवाला वडगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Vadgaon Maval

मकरसंक्रांतीचे औचित्य साधून मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या संकल्पनेतून वडगाव शहर मर्यादित भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 14, 2024
in लोकल, शहर
Kite-Festival-vadgaon-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मकरसंक्रांतीचे औचित्य साधून मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या संकल्पनेतून वडगाव शहर मर्यादित भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पतंग महोत्सवात शहरातील लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत सुमारे 1200 ते 1300 पतंग प्रेमी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित सर्व पतंग प्रेमींना मोरया प्रतिष्ठान आणि माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने मोफत पतंग आणि दोऱ्याचे रीळ वाटप करण्यात आले. लहान मुले-मुली, युवक तसेच पालकांनी मनसोक्त पतंग उडवण्याचा आनंद लुटला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मकरसंक्रांत निमित्ताने घेण्यात आलेल्या या पतंग महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रकारचे पतंग प्रत्यक्षात उडवण्याची तसेच पाहण्याची सुवर्णसंधी या नवीन वर्षाच्या सुरुवातीच लहान मुलांना तसेच पालकांना अनुभवायला मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. या पतंग महोत्सवातील मोठ्या पतंगावर प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, माझी वसुंधरा यांच्या प्रतिकृतीचे पतंग आकाशात झेपावल्याने लहानासह नागरिकांनी आनंद व्यक्त केला. नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत येत्या कालावधीतही वडगाव शहरातील नागरिकांसाठी अशाच सामाजिक, सांस्कृतिक, कला मनोरंजन आणि अत्यावश्यक अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांनी दिली.

मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, जेष्ठ नेते मंगेश ढोरे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, अबोली ढोरे, श्री पोटोबा देवस्थान विश्वस्त सुभाषराव जाधव, माजी सरपंच बापूसाहेब वाघवले, अरूण चव्हाण, माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, श्रीधर ढोरे, बारकूनाना ढोरे, शांताराम कुडे, पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, माजी नगरसेवक राहुल ढोरे, किरण म्हाळसकर, प्रविण चव्हाण, पूनम जाधव, माया चव्हाण, पूजा वहिले;

शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अतुल वायकर, मा उपसरपंच विशाल वहिले, रा काॅं अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष मजहर सय्यद, उद्योजक सचिन कडू, राजेश ढोरे, समीर दौंडे, रविंद्र काकडे, विनायक भेगडे पुणे काईट्स चे प्रमुख रमेश पारते, श्रीकांत चेपे आणि वडगाव शहरातील हजारों पतंगप्रेमी, सर्वपक्षीय पदाधिकारी, मोरया महिला प्रतिष्ठानच्या पदाधिकारी संचालिका, मोरया प्रतिष्ठानचे सर्व सभासद आणि शहरातील लहान मुले-मुली, नागरिक, मित्रपरिवार आदी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ( Kite Festival 2024 in Vadgaon Maval on behalf of Morya Foundation spontaneous response of citizens )

अधिक वाचा –
– शिलाटणे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह; महिंद्रा एक्सेलो कंपनीचा स्तुत्य उपक्रम । Maval News
– मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा दुपारच्या लोकल फेऱ्या पुर्ववत, सोमवारपासून असे असेल वेळापत्रक । Pune Lonavala Local
– तळेगाव नगरपरिषदेच्या ‘त्या’ जेसीबीचा इन्शूरन्स आधीच संपलेला? मुख्याधिकारी की ठेकेदार, नुकसानीला जबाबदार कोण?


Previous Post

चांदखेडमधील ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप; उपेक्षित घटकाला मुळ प्रवाहात आणण्यासाठी आमदार सुनिल शेळकेंकडून विशेष अभियान

Next Post

‘द कॉर्बेट फाऊंडेशन’ आणि ‘एचडीएफसी बँक – परिवर्तन’ मार्फत वनविभागाला 140 फॉरेस्ट कीटचे वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
forest-kits-pune-forest-department

'द कॉर्बेट फाऊंडेशन' आणि 'एचडीएफसी बँक - परिवर्तन' मार्फत वनविभागाला 140 फॉरेस्ट कीटचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

New executive committee of Maval Taluka Warkari Mandal announced

मावळ तालुका वारकरी मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर

February 25, 2026
Maval Land Records Office Maval Bhumi Abhilekh

मावळातील भूमिअभिलेख कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या हाती ; उपअधीक्षक सहीत चार पदांवर पूर्णवेळ अधिकारीच नाही

February 25, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

‘गाव तिथे स्मशानभूमी’ योजना सरकारच्या विचारधीन ; स्मशानभूमी नसलेल्या गावात आधी स्मशानभूमीसाठी निधी दिला जाणार

February 25, 2026
boards giving information about government schemes for students should be displayed in all schools

विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री

February 25, 2026
Action under MCOCA against those involved in drug ring assets of those involved will be confiscated

ड्रग्सच्या साखळीत सहभागी असणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई , संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाणार – मुख्यमंत्री

February 25, 2026
Indrayani river pollution

श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू

February 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.