व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आदिवासींच्या उत्थानासाठी ‘पीएम-जनमन’ महाअभियान । PM Janman Abhiyan

समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे हा दृष्टिकोन ठेवून विकासाच्या प्रवाहापासून वंचित घटकांना इतरांच्या बरोबरीने समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य प्रयत्न करीत आहेत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 18, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
PM-Janman-Abhiyan

File Image


समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे हा दृष्टिकोन ठेवून विकासाच्या प्रवाहापासून वंचित घटकांना इतरांच्या बरोबरीने समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य प्रयत्न करीत आहेत आहे. वंचित आदिवासी समूहांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीत सुधारणा घडवून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदिवासी समुहांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्याकरीता प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाची (पीएम-जनमन) सुरुवात करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त खुंटी झारखंड इथे जनजाती गौरव दिनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम-जनमन’ महाअभियानाची सुरुवात करण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम-जनमन या अभियानासाठी एकूण 24 हजार 104 कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत 9 मंत्रालयांच्या माध्यमातून सर्वांना पक्की घरे, प्रत्येक घरी नळाने पाणी, गावा-गावापर्यंत रस्ते, प्रत्येक घरापर्यंत वीज, शिक्षणासाठी वसतिगृह, कौशल्य विकास, गावोगावी फिरते वैद्यकीय पथक, सर्वांना पोषण, प्रगत जीवनमान, दुर्गम भागापर्यंत दूरसंचार सेवा अशा एकूण 11 महत्वाच्या कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ( PM Janman Abhiyan Information In Marathi )

लोकवस्त्यांच्या ठिकाणी आयुष निरामयता केंद्राची स्थापना करण्यात येत असून फिरत्या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य सुविधांचा नागरिकांना लाभ देण्यात येत आहेत. लक्ष्य निर्धारीत केलेल्या गटांमध्ये आयुष्मान कार्ड आणि सिकलसेल, ॲनिमियासाठीच्या तपासणीचे १०० टक्के पूर्ततेचे उद्दिष्ट ठेवले आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्यावतीने दुर्लक्षित आदिवासी समूहांच्या वस्त्या, बहुउद्देशीय केंद्रे आणि वसतिगृहांमध्ये या समुदायांकडे असलेली कौशल्य लक्षात घेऊन, त्या अनुषंगाने त्यांना कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मुलभूत प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेत विकसित करणे आणि समाजातील या दुर्लक्षित घटकांमध्ये साक्षरता आणि शिक्षणाचा सहज प्रसार सुनिश्चित करणे यावर भर देण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात 7, जुन्नर 17, खेड 36, मावळ 112, मुळशी 29 आणि भोर 33 असे एकूण 234 गावात कातकरी आदिम जमातीचे एकूण 15 हजार 51 नागरिक आहेत. या अभियानाच्यामाध्यमातून कातकरी समाजाला पक्की घरे, प्रत्येक घरी नळाने पाणी, गावा-गावापर्यंत रस्ते, प्रत्येक घरापर्यंत वीज, शिक्षणासाठी वसतीगृह, कौशल्य विकास, गावोगावी फिरते वैद्यकीय पथक, सर्वांना पोषण, प्रगत जीवनमान, दुर्गम भागापर्यंत दूरसंचार सेवा मिळण्यास मदत होणार आहे. एकूणच आदिवासी समाज ज्यांना प्रधानमंत्री वनवासी म्हणतात त्यांच्या उत्थानाचे ध्येय गाठण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन मिळून प्रयत्न करीत आहे.

अधिक वाचा –
– कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना : दिनांक 26 ते 28 जानेवारी दरम्यान होणार ‘मावळ फेस्टिवल’ । Maval Festival
– लोणावळ्यात शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा संपन्न; संजोग वाघेरे हेच मावळ लोकसभेचे उमेदवार? । Maval Lok Sabha
– मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, महामार्गावर 6 तासांचा ब्लॉक, लगेच वाचा । Mumbai Pune Expressway


dainik maval jahirat

Previous Post

’22 जानेवारीला वडगावमधील मांस व मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवा’, राष्ट्रवादीकडून पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाला निवेदन

Next Post

द्रुतगती मार्गावर भल्या पहाटे गंभीर अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू । Mumbai Pune Expressway Accident

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Tempo-Accident

द्रुतगती मार्गावर भल्या पहाटे गंभीर अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू । Mumbai Pune Expressway Accident

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.