Dainik Maval News : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पर्यटनस्थळांसाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत लागू करण्यात आलेला आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी रद्द केला आहे.
लोणावळा ग्रामीण परिसरातील एकवीरा देवी मंदिर, कार्ला व भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोणा व तुंग किल्ले, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण आदी पर्यटनस्थळी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी व संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कलम १६३ लागू करण्यात आले होते.
मात्र, सध्या पावसाचा वेग कमी झाला असून जनजीवन सुरळीत सुरू असल्याने परिस्थितीचा आढावा घेऊन ६ जुलै २०२६ रोजीचा आदेश रद्द करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास
– पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके
– डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक
