व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 28, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील पिंपरी बुद्रुक गावात महिलांसाठी समाज केंद्राची उभारणी; बचत गटातील महिलांसाठी प्रथमच ‘लोणचे उद्योगास’ सुरुवात

मावळ तालुक्यातील पिंपरी बु. येथे श्री अशोक सिंघल मेमोरिअल ट्रस्ट मुंबई मार्फत महिला बचत गटासाठी लोणचे उद्योगास सुरुवात.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 25, 2024
in लोकल, ग्रामीण
Ashok-Singhal-Memorial-Trust

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पिंपरी बुद्रुक याठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील समाजकेंद्रात “श्री अशोक सिंघल मेमोरिअल ट्रस्ट, मुंबई संचालित ग्रामदूत प्रकल्पांतर्गत गावातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी लोणचे बनवण्याच्या व्यवसायास सुरुवात करण्यात आली. श्री अशोक सिंघल मेमोरिअल ट्रस्ट मुंबई संचालित ग्रामदूत हा प्रकल्प मावळ तालुक्यातील (आंदर मावळ आणि पवन मावळ) येथील 17 ग्रामपंचायत आणि ६८ वाड्या वस्त्यामध्ये राबविला जात आहे. सदर प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शिक्षण, आरोग्य, पाणी, उपजिविका आणि भौतिक विकास या आयामाअंतर्गत लोकसहभागातून ग्राम विकासाची कामे केली जात आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

त्यामध्ये माऊची डोंगरवाडी आणि कुसवली येथील पेयजल योजना, विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकास व्हावा म्हणून 50 वाड्या वस्त्यामध्ये स्वविकास केंद्रास सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक विकास व्हावा म्हणून knowledge on wheel ची सुरवात केली. सर्वसाधारण आरोग्य सेवा सुरु केल्या, कडधान्य वाटपातून मुलांचे आरोग्य व त्यांचे पोषण चांगले व्हावे हा उद्देश आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसायांना सुरुवात केली आहे. तसेच ग्रामीण भागात विविध व्यवसाय करण्यासाठी लोकसहभागातून समाज केंद्राची उभारणी केली जात आहे. ( pickle making project started for women SHG groups through Ashok Singhal Memorial Trust at Pimpri Village Maval )

पिंपरी बु. गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व समाज केंद्र संस्थेच्यावतीने लोकसहभागातून बांधण्यात आले. त्याचे लोकार्पण दि. 8 जानेवारी 2024 रोजी करण्यात आले. सदर मंदिरातील समाज केंद्रात संस्थेच्या वतीने दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी पिंपरी बु.येथील महिला बचत गटासाठी प्रथमच लोणचे उद्योगास सुरुवात करण्यात आली. सदर उद्योगांमार्फत विविध प्रकारची लोणची तयार करण्यात येणार असून, याची प्रथम चाचणीचे प्रशिक्षण “होमपीक” या नावाजलेल्या मुंबई येथील उद्योग समूहाच्या माध्यमातून देण्यात आले.

प्रथम चाचणीत “मुरआवळा” कसा तयार केला जातो, याचे प्रत्याक्षिकासह प्रशिक्षण ही दिले आणि मूरआवळा तयार करण्यात आला. सदर प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण करण्यासाठी “होमपीक” या उद्योगसमुहाचे मालक चिन्तंजी बयानी उपस्थित होते. त्यांनी येथे तयार होणारे सर्व लोणचे त्यांच्या उद्योगसमूहाच्या माध्यमातून विकत घेतले जाईल असे सांगितले. तसेच संस्थेचे संचालक सुरेश पंसारी, प्रकल्प प्रमुख माणिक गवळी, प्रकल्प समन्वयक लक्ष्मण केंगले, महिला बचत गटातील सर्व महिला, सरपंच राजेश कोकाटे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्थेने केलेल्या लोणचे उद्योगाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

अधिक वाचा –
– Breaking! लोहगड किल्ल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरूसाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी । Lohgad Fort News
– मावळमध्ये विकास कामांचा धडाका! खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते 21.50 कोटींच्या कामांचे भूमिपूजन । Maval News
– मावळ तालुक्यात कुठल्या शहरात आणि किती वाजता येणार मराठा समाजाचे भगवे वादळ? पाहा मनोज जरांगे यांचे आजचे वेळापत्रक । Maratha Reservation Manoj Jarange Patil


Previous Post

मनोज जरांगे पाटील मावळ भूमीत दाखल, पहाटे उशीरा वाकसई मुक्कामस्थळी जरांगेंचे आगमन, 9 वाजता होणार जाहीर सभा । Maratha Reservation Manoj Jarange Patil

Next Post

किवळे, देहू बाजारपेठ भागात एफडीएचे छापे, तब्बल 35 लाखांचे प्रतिबंधित पदार्थ जप्त; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन, वाचा… । Crime News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

किवळे, देहू बाजारपेठ भागात एफडीएचे छापे, तब्बल 35 लाखांचे प्रतिबंधित पदार्थ जप्त; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन, वाचा... । Crime News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा संपूर्ण नियमावली । Pune News

June 28, 2025
Committee formed regarding POP Ganesh idols Information from CM Devendra Fadnavis

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 28, 2025
Awareness campaign on occasion of Anti-Drug Day at Shri Shivaji Vidyalaya Dehu Road

देहूरोड : श्री शिवाजी विद्यालयात अंमली पदार्थ विरोध दिनानिमित्त जनजागृती । Dehu Road News

June 28, 2025
revised development plan of Vadgaon Maval city Villagers strongly oppose BJP statement to CEO

वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जीणा? ग्रामस्थांचा कडाडून विरोध, भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval

June 28, 2025
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

9890616089 हा नंबर सेव्ह करा; तक्रारीची प्रभावी व्यवस्था होण्यासाठी तळेगाव नगरपरिषदेकडून व्हॉट्सॲप क्रमांक । Talegaon Dabhade

June 28, 2025
Police committed to keeping Talegaon MIDC industrial area free from fear PC Vinay Kumar Choubey assures

तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध ; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आश्वासन

June 28, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.