अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दोन ठिकाणी छापे टाकून 35 लाख 16 हजार 921 रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी आदींचा साठा जप्त करण्यात आला. पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
देहू रोड परिसरातील दांगट पाटील यांचे गोदाम, विकासनगर किवळे या ठिकाणी प्रतिबंधित पदार्थाची साठवणूक व विक्री करण्यात येत असल्याच्या माहितीवरुन मंगळवारी (दि. 23) टाकलेल्या छाप्यानुसार 23 लाख 68 हजार 580 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच रियाझ अजीज शेख, घर क्र. 125, देहू मुख्य बाजार, देहू कॅन्टोन्मेंट, देहू बाजार येथे आज टाकलेल्या छाप्यात 11 लाख 48 हजार 341 रुपये किंमतीचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही प्रकरणात देहूरोड पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) एन. आर. सरकटे, अन्न सुरक्षा अधिकारी शीतल घाटोळ, सायली टाव्हरे, अस्मिता गायकवाड, राहूल खंडागळे, बालाजी शिंदे आणि प्रकाश कचवे यांनी केली. नागरिकांचे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून 18 जुलै 2023 च्या आदेशानुसार राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाकु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदार्थावर उत्पादक, साठा, वितरण व विक्री यावर 1 वर्षाकरिता बंदी घातलेली आहे.
प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला इत्यादीच्या विक्रीबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) अ. गो. भुजबळ यांनी केले आहे. ( Food and Drug Administration FDA raids in Kiwale Dehu area seized banned substances worth 35 lakhs )
अधिक वाचा –
– व्हॉट्सअॅपद्वारे खोटी माहिती पसरवणे ते चौकात बॅनर लावणे, कलम 144 मुळे लोहगड भागात कशावर प्रतिबंध? जाणून घ्या । Lohgad Fort News
– लोहगड किल्ल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरूसाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी । Lohgad Fort News
– मावळमध्ये विकास कामांचा धडाका! खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते 21.50 कोटींच्या कामांचे भूमिपूजन । Maval News