व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोहगड किल्ल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरूसाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी । Lohgad Fort News

मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरूस साजरा करण्यासाठी 25 जानेवारी रोजी हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात लोहगड व घेरेवाडी या परिसरात येण्याची शक्यता आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 25, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Lohagad-Fort

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील (जि. पुणे) लोहगड किल्ल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरूसाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी लोहगड व घेरेवाडी परिसरात 25 जानेवारी रोजी मध्यरात्री पासून ते 26 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरूस साजरा करण्यासाठी 25 जानेवारी रोजी हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात लोहगड व घेरेवाडी या परिसरात येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. ( Prohibitory order issued in view of Haji Hazrat Umarshawali Baba Dargah Urus at Lohgad Fort Maval )

त्यानुसार कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाहीत किंवा फॉरवर्ड करणार नाही याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असेल. लोहगड व घेरेवाडी हद्दीतील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील.

कोणताही कार्यक्रम हा पोलीस विभागाच्या व इतर विभागाच्या आवश्यक पूर्वपरवानगी शिवाय करण्यात येवू नये. समाजभावना भडकवतील अशा घोषणा, भाषण करू नये. या परिसरात मोर्चा, आंदोलन करण्यात येवू नये. प्रतिबंधित कालावधीत धार्मिक विधीसाठी पशु पक्षांचा बळी दिला जाऊ नये. ऐतिहासिक व सार्वजनिक वस्तूंचे नुकसान करण्यात येवू नये. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद केले आहे.

अधिक वाचा –
– मुंबई-पुणे प्रवासासाठी घराबाहेर पडणार असाल तर आधी ही बातमी वाचा, नाहीतर अडकाल… । Mumbai Pune Expressway News
– अंतिम मतदार यादी जाहीर! महाराष्ट्रात 9 कोटी 12 लाख मतदार, पुणे जिल्ह्यात चिंचवड सर्वात मोठा मतदारसंघ, मावळ विधानसभेतही मतदारांची वाढ
– मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी मावळ तालुक्यातील मराठा बांधव सज्ज; जागोजागी संघर्षयोद्ध्याच्या स्वागताचे बॅनर । Manoj Jarange Patil In Lonavala Maval


dainik maval jahirat

Previous Post

मावळमध्ये विकास कामांचा धडाका! खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते 21.50 कोटींच्या कामांचे भूमिपूजन । Maval News

Next Post

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे खोटी माहिती पसरवणे ते चौकात बॅनर लावणे, कलम 144 मुळे लोहगड भागात कशावर प्रतिबंध? जाणून घ्या । Lohgad Fort News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Section-144-Applicable-In-Lohgad-Gherewadi-Area

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे खोटी माहिती पसरवणे ते चौकात बॅनर लावणे, कलम 144 मुळे लोहगड भागात कशावर प्रतिबंध? जाणून घ्या । Lohgad Fort News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.