मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज, बुधवार (दिनांक 24 जानेवारी) रोजी लोणावळा शहराजवळील वाकसई फाटा इथे मराठ्यांचे हे भगवे वादळ मुक्कामी असणार आहे. त्यासाठी सकल मराठा समाज मावळ तालुका यांच्याकडून पद्धतशीर नियोजन करण्यात आले आहे. वाकसई इथे तब्बल 100 एकराचा परिसर त्यासाठी साफ करण्यात आला असून येथे आंदोलक विसावा घेणार आहेत. तर दुसरीकडे आजूबाजूच्या गावांत पार्किंगची सोय करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मनोज जरांगे यांंसह लाखो मराठा बांधव मावळ तालुक्यात येणार असल्याने आधीपासून नियोजनाची आणि स्वागताची तयारी करण्यात आली. मावळ तालुक्यात तळेगाव, वडगाव, कामशेत पासून ते लोणावळा आणि अनेक गावात मराठा आंदोलक आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठाले बॅनर लावण्यात आली आहे. तसेच अनेक संघटना आणि पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या परिने आंदोलकांच्या जेवणाची आणि पाण्याची सुविधा करण्याचे प्रयत्न केले आहेत. ( Maratha Community Ready To Welcome Manoj Jarange Patil Maratha Reservation Lonavala Stay Maval Taluka )
आमदार सुनिल शेळके यांनी मंगळवारी मुक्काम ठिकाणाची पाहाणी केली. तसेच मावळ तालुक्यातील नागरिकांना, ‘सर्व समाजातील बांधवांनी शक्य होईल त्या पद्धतीने सहकार्य करावे. मावळ तालुक्याने नेहमीच जातीय सलोखा आणि एकोपा जपला आहे. पदयात्रेच्या निमित्ताने तालुक्यात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करणे आपली जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आपल्या तालुक्याकडून कुठल्या गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे,’ असे आवाहनही केले आहे.
तसेच मावळ तालुक्यातील प्रत्येक गावखेड्यातून आणि तळेगाव, कामशेत, लोणावळा, वडगाव सारख्या शहरांतून सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलकांसाठी प्रत्येक घरातून पंचवीस भाकरी, शेंगदाणा चटणी आणि ठेचा देण्याचे काम केले जात आहे. तसे आवाहन घरोघरी मंडळे, सामाजिक संघटनांनी केले होते. त्यातून जमा झालेला शिधा यावेळी आंदोलकांना देण्यात येणार आहे.
अधिक वाचा –
– मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मावळ तालुका सज्ज, आमदार सुनिल शेळके यांचे मावळवासियांना आवाहन, वाचा… । Manoj Jarange Patil & MLA Sunil Shelke
– कार्ला जवळील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगे पाटील यांचा हुबेहुब पुतळा, जरांगे स्वतः पुतळा पाहायला येणार? । wax statue of manoj jarange patil
– महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मदतीचा हात; मालेवाडी, महागाव येथे महिलांना पिठाची गिरण आणि मसाला बनवण्याच्या यंत्राचे वाटप