हॅन्ड इन हॅन्ड इंडिया सामाजिक संस्था तळेगाव दाभाडे आणि फिन्चम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण आणि उन्नतीसाठी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करणे, त्यांना सरकारी योजनांची माहिती देणे, सोबतच व्यवसायासाठी प्रशिक्षण आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे, हे कार्यक्रम राबवले जात आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ह्या अंतर्गत मालेवाडी महागाव इथे महिला बचत गटातील महिलांना पीठ गिरण आणि मसाला बनवण्याच्या यंत्रांचे वाटप करण्यात आले. मदतीचा मुख्य उद्देश हा महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण असून विविध प्रकारच्या महिला बचत गटांना कौशल्य प्रशिक्षण देणे तसेच त्यांना उद्योग निर्मितीसाठी सहाय्य करणे हा आहे. ( Women Economic Empowerment Distribution of flour mill and spice making machine at Malewadi Mahagaon )
महागाव, मालेवाडी (ता. मावळ जि. पुणे) या ठिकाणी दिनांक 08 जानेवारी 2024 रोजी मशीनचे उद्घाटन करण्यात आले. मालेवाडीत आणि इतर वाडीतील ग्रामस्थांना दळण दळण्यासाठी पवनानगर इथे जावे लागते. पण ह्या मशीनने त्यांचा वेळ आणि पैसा याची बचत होण्यास आणि उत्पन्नात वाढ होण्यात मदत होणार आहे.
मशीनचे उद्घाटन सरपंच गोरख डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हॅन्ड इन हॅन्ड कडून ओंकार कुलकर्णी, कविता ढोकरे, अश्विनी खराडे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी ओंकार कुलकर्णी यांनी ग्रामपंचायत महागाव सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– ‘मावळ तालुक्यात ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळून आल्यात त्यांची यादी ग्रामपंचायतीबाहेर लावावी’; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन
– मदतीचा हात! विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेतील 70 गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप । Dehu News
– शेकडो वर्षांची प्रतिक्षा संपली… प्रभू श्रीराम राममंदिरात विराजमान! पाहा रामलल्लाचं तेजस्वी रुप । Ram Lalla Idol Unveiled ShriRam Temple Ayodhya