मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहेत. बुधवार, दिनांक 24 जानेवारी रोजी लोणावळा शहराजवळील वाकसई फाटा येथे जाहीर सभेचे नियोजन असुन मुक्काम देखील याच ठिकाणी होणार आहे. याकरिता सुमारे 100 एकर पेक्षा अधिक जागा साफसफाई करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून सभेची जोरदार तयारी या ठिकाणी सुरु आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सकल मराठा समाजाचे हजारो तरुण या ठिकाणी मदत कार्य करीत असलेले चित्र पाहायला मिळत आहे. आज (दि. 23) दुपारी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी या सभेच्या ठिकाणाला भेट देत जागेची पाहणी केली. तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती घेतली. ( Maratha Reservation Manoj Jarange Patil Stayed at Lonavala Maval on 24th January MLA Sunil Shelke Field inspection )
यावेळी आमदार सुनिल शेळके म्हणाले, ‘मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या भव्य स्वागतासाठी मावळ तालुका सज्ज झाला आहे. सर्व समाजातील बांधवांनी शक्य होईल त्या पद्धतीने सहकार्य करावे. मावळ तालुक्याने नेहमीच जातीय सलोखा आणि एकोपा जपला आहे. पदयात्रेच्या निमित्ताने तालुक्यात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करणे आपली जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आपल्या तालुक्याकडून कुठल्या गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे,’ असे आवाहन देखील आमदार शेळके यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– मुंबईच्या दिशेने निघालेले मराठ्यांचे भगवे वादळ 24 तारखेला मावळ तालुक्यात येणार; वाकसई इथे 100 एकरात जंगी सभेची तयारी । Maratha Reservation
– सिनेस्टाईल पाठलाग करून पकडली गाडी, एफडीएच्या धडक मोहिमेत 47 लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त । Pune Crime News
– ‘मावळ तालुक्यात ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळून आल्यात त्यांची यादी ग्रामपंचायतीबाहेर लावावी’; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन