पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे शहरात टोनी दा ढाबा, पाषाण सर्व्हिस रोड, पाषाण येथील धडक मोहीमेत एमएच 46 एआर 4973 या वाहनाचा पाठलाग करून 47 लाख 22 हजार 300 रुपयांचा प्रतिबंधित साठा व एक वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
औषध प्रशासनाच्या मंत्रालयीन कार्यालयातून प्राप्त गोपनीय माहितीच्या अनुषंगाने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहमेअंतर्गत 1 वाहन जप्त करण्यात आले असून चतुःशृंगी पोलिस स्टेशनमध्ये वाहनचालकासह तिघांवर एफआयआर दाखल करण्यात आलेले आहेत. जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातुन राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदर्थावर उत्पादक साठा, वितरण, वाहतुक तसेच विक्री यावर 1 वर्षाकरीता बंदी घातलेली आहे.
प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला इत्यादीच्या विक्री बाबतची माहिती असल्यास जागरुक नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) अ. गो. भुजबळ यांनी केले आहे. ( Food and Drug Administration Department seizes restricted stock worth 47 lakhs in Pune City Crime News )
अधिक वाचा –
– शेकडो वर्षांची प्रतिक्षा संपली… प्रभू श्रीराम राममंदिरात विराजमान! पाहा रामलल्लाचं तेजस्वी रुप । Ram Lalla Idol Unveiled ShriRam Temple Ayodhya
– ‘लोणावळा उपजिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लांटसाठी आवश्यक जागा नगरपरिषद देईल’ – आमदार शेळके
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनानगर ते कोथूर्णे रस्ता आणि आर्डव-ब्राम्हणोली रस्त्याचे भूमिपूजन । Maval News