मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या मावळ तालुक्यातील 3 कोटी 77 लाख रुपये रस्ते विकास कामांचा भूमिपूजन समारंभ सोहळा खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील महत्वाची बाजार पेठ असणाऱ्या पवन मावळ भागातील रस्त्यांच्या कामांना पुणे महानगर विकास प्राधिकरण अंतर्गत खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून काले कॉलनी ते कोथूर्णे रस्त्याच्या कामासाठी 241.56 लक्ष रुपये आणि अर्डव ते ब्राम्हणोली रस्त्याच्या कामासाठी 135.96 लक्ष रुपये निधी मंजूर झाला होता. या दोन्ही रस्ते विकास कामांचे भूमिपूजन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. ( Pavananagar to Kothurne and Arnav Brahmanoli road bhumi pujan ceremony by MP Shrirang Barane )
यावेळी शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजुभाऊ खंडाभोर, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, भाजपा उपाध्यक्ष गणेश ठाकर, संदीप भुतडा, आर.पी.आय चे युवा नेते अंकुश सोनवणे, कोथुर्णे गावचे सरपंच संदीप दळवी, उपसरपंच पल्लवी फाटक, सुनील हगवणे, माजी सरपंच प्रमोद दळवी, विश्वनाथ दळवी, किसन गावडे, भाऊसाहेब दळवी, शिवाजी ढोले यांच्यासह पवन मावळ भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ राष्ट्रवादीतील शरद पवार गटाची वडगाव इथे विशेष बैठक; विधानसभा क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर । Maval NCP
– आंघोळीला पाणी दिले नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण, पाहा कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार । Crime News
– आदित्य ठाकरे यांची तळेगावमधील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट । Talegaon Dabhade