तळेगांव दाभाडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील कारसेवकांचा ‘श्रीराम भक्त’ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि कारसेवकांच्या हस्ते प्रथम भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन, प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच काळ झालेल्या कारसेवकांना यावेळी सामुहिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यानंतर कारसेवक श्रीराम भक्त राजाभाऊ जांभुळकर, सुरेशनाना दाभाडे, रविंद्र आचार्य, ॲड श्रीराम कुबेर यांनी त्यांच्या अयोध्येतील कारसेवेदरम्यानच्या आठवणी सांगितल्या. कार्यक्रमांचे प्रमुख वक्ते संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. ( Kar Sevak Honored By Bala Bhegade On Behalf Of Talegaon Dabhade BJP )
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रविंद्र दाभाडे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, निर्मलवारीचे संयोजक संतोष दाभाडे, माजी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, विजया भांडवलकर, मिरा फल्ले, उमाकांत कुलकर्णी, सचिन टकले, नगरसेविका मंगल जाधव, कल्पना भोपळे, विभावरी दाभाडे, रंजनी ठाकुर, तळेगाव भाजपाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कारसेवक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनायक भेगडे, स्वप्निल भेगडे, आनंद पुर्णपात्रे, अतिश रावळे, गौरव गुंड, ऋषिकेश सुतार यांनी केले, स्वागत शोभा भेगडे यांनी केले, प्रास्ताविक भाजपा शहराध्यक्ष अशोक दाभाडे यांनी केले, तर आभार महिला मोर्चाच्या अध्यक्षा शोभा परदेशी यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन तनुजा दाभाडे, मृदुला भावे, संध्या जाधव, स्मिता पोरे, योगेश पाटील, सतिश पारगे, शिवांकुर खेर, अनिल वेदपाठक, हिम्मतभाई पुरोहित, यमुनाकुमार शहा यांनी केले.
अधिक वाचा –
– आंघोळीला पाणी दिले नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण, पाहा कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार । Crime News
– आदित्य ठाकरे यांची तळेगावमधील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट । Talegaon Dabhade
– अवघी कामशेत नगरी झाली राममय… प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणूकीत हजारो रामभक्तांची उपस्थिती । Maval News