दिनांक 22 जानेवारी रोजी आयोध्या येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 14 ते 22 जानेवारी या कालावधीत देशातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता करण्याचे आवाहन केले होते. या निमित्ताने मावळ विधानसभा मतदार संघातील श्री क्षेत्र देहूगाव येथील जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्यातील पदाधिकारी, देहूतील ग्रामस्थ यांच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी आमदार श्रीकांत भारतीय, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, देहूगाव शहर अध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल यांच्यासह भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्यातील आणि देहूगाव शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( cleanliness campaign at tukaram maharaj temple area in dehu village )
अधिक वाचा –
– आदित्य ठाकरे यांची तळेगावमधील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेला सदिच्छा भेट । Talegaon Dabhade
– अवघी कामशेत नगरी झाली राममय… प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणूकीत हजारो रामभक्तांची उपस्थिती । Maval News
– लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर आणि सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता । Lonavala News